For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangali Politics : अण्णाभाऊ साठे समितीचा राष्ट्रवादी श. प पक्षाला पाठिंबा

05:19 PM Nov 29, 2025 IST | NEETA POTDAR
sangali politics   अण्णाभाऊ साठे समितीचा राष्ट्रवादी श  प पक्षाला पाठिंबा
Advertisement

                सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा

Advertisement

ईश्वरपूर:  माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील उरूण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

पुतळा समितीचे अध्यन्न उत्तम चांदणे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पश्नाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, जयंती महोत्सव समितीचे बापूराव बडेकर, संतोष चांदणे, मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष विजय लोंढे, सरचिटणीस संजय खबळे, राष्ट्रवादी बांधकाम संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तम चांदणे म्हणाले, या शहरात सत्य शोधक अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा, ही आम्हा सर्वांची भाबना होती. त्यासाठी आम्ही सर्वांनी संघर्ष केला. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेत राजारामबापू सहकारी बँकेच्या वतीने पुतळा उभारण्याची तयारी दाखवून भूमिपूजनही केले.

Advertisement

त्यांनी या शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याचीही भूमिका घेतली आहे. भारतीय संविधान,
या राज्यातील पुरोगामी विचार जतन करण्यासाठी, या शहराचा खुंटलेला विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी माजी मंत्री आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवारांना पाठबळ देणे, हे आम्ही आमचे उत्तरदायित्व समजतो.

यावेळी पिराजी थोरवडे, सागर अशोक चव्हाण, गणेश चांदणे, तुषार लोंढे, शशिकांत वायदंडे, जेष्ठ कार्यकर्ते नाना गणपती लोंढे, यांच्यासह कारखान्याचे संचालक शैलेश पाटील, रणजित गायकवाड, आबासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.