For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्यची वाटचाल सहकारातून समृद्धीकडे...

10:52 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्यची वाटचाल सहकारातून समृद्धीकडे
Advertisement

दादर येथील पारसी जिमखान्यात आयोजित आनंद मेळावा

Advertisement

मुंबई : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होत असून मुंबई विभागातून 1 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा टप्पा पार केला आहे. हे सर्व तुमच्या सहकार्याने आणि कर्मचाऱ्यांच्या कष्टाने साधता आले आहे. आगामी काळात गुंतवणुकीचे मोठे ध्येय समोर असावे, असे लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व ‘तऊण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी सांगितले. लोकमान्य सोसायटी मुंबई विभागाने रिजनकडून 1 हजार कोटींचा टप्पा पार केल्यानिमित्त दादर येथील पारसी जिमखान्यात आयोजित आनंद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर, विभागीय व्यवस्थापक रमेश शिरसाट, संचालक पंढरी परब, असिस्टंट रिजनल मॅनेजर अतुल परब, गायिका योजना शिवानंद, गायिका केतकी भावे-जोशी, निवफत्त असिस्टंट पोलीस क्राईम ब्रँच आयुक्त सुरेश वालीशेट्टी, तसेच दैनिक सामनाचे दीपक शिंदे आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, डिसेंबरमध्ये गुंतवणुकीचा 1 हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. 2009 साली 2 जैन मंदिरसमोर, सनशाईन हाईट्स येथे मनोहर जोशींच्या हस्ते सुऊवात केली. 95 मध्ये बेळगावात परवानगी मिळवून 50 शाखांचे उद्घाटन संपादक या नात्याने स्वत: केल्याचे ठाकुर यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला असून लढाऊ वृत्तपत्र काय असते याची चुणूक दाखवली. समाजसेवा, शिक्षण सहकार आणि अन्य सेवांमध्ये ‘तऊण भारत’ आणि ‘लोकमान्य’ संस्था आघाडीवर राहिली. लोकमान्य सोसायटी लोकमान्य टिळकांच्या विचारांची छाप असलेली संस्था होय. देश आणि समाजाकरिता झटण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेचा सर्व क्षेत्रात मुक्त वावर तसेच शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू आहे. लोकमान्यने विशेष टप्पा पार केल्याने 1 लाख कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्टही त्यांनी बोलून दाखविले.

Advertisement

‘स्वरांचे चांदणे’

लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या आनंद मेळाव्यात हजारो ठेवीदारांनी सहभाग नोंदवला. यावेळी ठेवीदार रसिकांसाठी ‘स्वरांचे चांदणे’ महफिलींचे आयोजन केले होते. रसिकांसाठी ही संगीत पर्वणी ठरली. यात सारेगमपचा विजेता विश्वजीत बोरवणकर आणि गायिका, गीतकार, अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी सुरांची महफिल रंगवत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Advertisement
Tags :

.