For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य ट्रस्टच्या ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज’ला लवकरच सुरुवात

11:22 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य ट्रस्टच्या ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज’ला लवकरच सुरुवात
Advertisement

बेळगाव : नेहमीच्या चाकोरीतून विरंगुळा म्हणून पर्यटन करण्याची आवड प्रत्येकालाच असते. त्यामुळेच आज पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) या दोन क्षेत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. या दोन उद्योगांना जागतिक स्तरावर मिळणारे महत्त्व पाहता या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. या दोन क्षेत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन आज पंचतारांकित हॉटेल व्यावसायिकसुद्धा लहान शहरांमध्ये आपला व्यवसाय रुजवू पाहत आहेत. तरुणाईने करिअर म्हणून या क्षेत्राचा विचार करावा आणि त्यांना उत्तम व मान्यताप्राप्त संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे लोकमान्य ट्रस्टचे ‘माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज’ लवकरच सुरू होत आहे. साधारणत: पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा विचार करून या महाविद्यालयातील अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. अनुभवी प्राध्यापक येथे नेमण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण मिळणार आहे. इतकेच नव्हे तर पुढे त्यांना देशात आणि परदेशातही पंचतारांकित हॉटेलसह अन्यत्र नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. लोकमान्य ट्रस्टचे माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज हे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या नोयडा येथील एनसीएचएमसीटी, दिल्ली या संस्थेशी संलग्न आहे. येथून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) कडून पदवी प्रदान केली जाणार आहे.

Advertisement

लोकमान्य ट्रस्टच्या माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये उपलब्ध असणारे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-

  • दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सर्टिफिकेट स्तरावरचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
  • बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला किंवा पदवीधर विद्यार्थ्याला तीन वर्षाची बॅचलर्स डिग्री (पदवी) इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा दीड वर्षाचा डिप्लोमा स्तरावरचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
  • अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना गोवा, मुंबई, बेंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि हैद्राबाद किंवा अन्य ठिकाणी असणाऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंटर्नशीप पूर्ण करता येईल किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेता येईल. अभ्यासक्रमाच्या अखेरीस संस्थेतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू किंवा जॉब प्लेसमेंटची संधीही आहे. सावंतवाडीपासून गोवा जवळ असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून गोव्यातील पंचतारांकित हॉटेलना भेट देऊन तेथील कामकाजाची पद्धत समजावून घेता येईल.

इतकेच नव्हे तर दुबई, अबुधाबी, मस्कत, मॉरिशस, थायलंड, मलेशिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका येथील पंचतारांकित हॉटेलमध्येसुद्धा इंटर्नशीप करता येईल. संस्थेने आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी व महाविद्यालयाशी समन्वय करार केला असल्याने विद्यार्थ्यांना इंग्लंड, सिंगापूर आदी ठिकाणी अभ्यासेतर जॉब प्लेसमेंटची संधी उपलब्ध होईल. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश खुले झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना थेट संस्थेमध्ये येऊन प्रवेश घेता येईल. अधिक माहितीसाठी 9373021616 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.