नवीन वर्षात लोकमान्य सोसायटी तर्फे लोकमान्य शुभारंभ २०२५ ठेव योजना सादर
नवीन वर्षाची सुरुवात होत असताना, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने लोकमान्य शुभारंभ २०२५ हि ठेव योजना सादर केली आहे. या ठेव योजनेत किमान गुंतवणूक रु.१०००० असून १३ महिन्याच्या कालावधीसह १०% वार्षिक व्याजदर तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी ०.५०% अतिरिक्त व्याजदर देण्यात येणार आहे.लोकमान्य शुभारंभ २०२५ योजना आर्थिक वृद्धीसाठी एक उत्तम पर्याय आहे. योजनेची खास वैशिठ्य म्हणजे ती सुरक्षित आणि उच्च परतावा देणारी आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि खात्रीशीर आर्थिक लाभ मिळू शकते . तसेच ती दीर्घकालिन आणि लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरते.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही विश्वास व उत्कृष्टतेचा वारसा लाभलेली अग्रगण्य संस्था महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये कार्यरत असून या संस्थेची 213 शाखांचे विस्तृत जाळे ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा प्रदान करते. लोकमान्य सोसायटी फिक्स्ड डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स, कर्जे, विमा, आणि म्युच्युअल फंड यांसारखी अशी विशिष्ठ सेवा देत आहे. आर्थिक समावेश आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकमान्य सोसायटी नेहमीच प्रयत्नशील आहे. या ठेव योजने संदर्भात अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य शाखेला भेट किंवा 1800-212-4050 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हाहन संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.