लोकमान्यतर्फे गणपती बनविण्याची कार्यशाळा
‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’च्यावतीने पुण्यात आयोजन
पुणे : ‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’च्यावतीने सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात ‘गणपती तयार करणे’ ही कार्यशाळा घेण्यात आली. महर्षी कर्वे स्त्राr शिक्षण संस्था, इचलकरंजी हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते राकेश बापट आणि राजेंद्र जोग यांचा सत्कार करण्यात आला. कर्वे स्त्राr शिक्षण संस्था येथील अनाथ विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. कर्वे स्त्राr शिक्षण संस्थेचे विश्वस्त राजेंद्र जोग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुकुल मारणे, प्रसाद राव, सुधर्म कुलकर्णी आणि नीलेश महाजन यांनी केले. राकेश बापट यांचे स्वागत मेधा ताडपत्रीकर यांनी केले. आभार आभा औटी यांनी मानले.