लोकमान्य मॅरेथॉन स्पर्धा 12 जानेवारी रोजी
अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, सानिया मिर्झा प्रमुख आकर्षण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने एनजीओ लोककल्प फौंडेशनच्या समर्थनार्थ 12 जानेवारीला ‘लोकमान्य मॅरेथॉन 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची भारतीय टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रमुख आकर्षण ठरणार असून तिचे बेळगावमध्ये प्रथमच आगमन होत आहे. अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन लोकमान्यतर्फे करण्यात आले आहे. लोकमान्य आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेवेळी प्रमुख अतिथी म्हणून भारताचे नाव टेनिस जगतात उज्वल करणारी टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रथमच बेळगावात येणार आहेत. 6 लाखाहून अधिक बक्षिसाच्या या मॅरेथॉन स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील धावपटू त्याचप्रमाणे आंतरराज्य धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनमधून मिळणारे उत्पन्न लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल. यामध्ये शालेय साहित्य, स्वेटर, शाळांना मदत व शैक्षणिक सुविधा पुरविणे या सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे या मॅरेथॉनच्या माध्यमातून आयोजकांनी शैक्षणिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्याचे तसेच वंचित समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योगदान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या स्पर्धेत दै. तरुण भारत यांचे मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य लाभले आहे.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने कणकुंबी व चोर्ला जंगलातील दुर्गम भागातील 32 खेडी दत्तक घेतली आहेत. नियमितपणे शाळांना हिरव्या व काळ्या फळ्याचे वितरण, शैक्षणिक साहित्य व स्वेटर या सारखी आवश्यक शैक्षणिक साधने पुरविण्यात येतात. या शिवाय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी कटिबद्ध आहेत. ही मॅरेथॉन वंचित समाजातील विद्यार्थी कल्याणासाठी पाठिंबा देण्याच्या उदात्त उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा, बागलकोट, जमखंडी, मुधोळ, विजापूर, हुबळी-धारवाड, गोवा, सावंतवाडी, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी आणि उर्वरित महाराष्ट्रातील विविध वयोगटातील 5000 हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
नोंदणी शुल्क
3 कि.मी.साठी 300 रुपये, 5 कि.मी. 700 रुपये, 10 कि.मी. 800 रुपये. नोंदणी शुल्क आहे.
10 कि.मी. धावणे गट
- 30 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.
- 30 ते 45 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.
- 45 ते 55 वर्षे वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 20 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.
- 55 वर्षांवरील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 25 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 15 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 10 हजार रुपये बक्षीस आहे.
5 कि. मी. धावणे गट
- 17 वर्षांखालील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 10 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 7 हजार रुपये बक्षीस आहे.
- 17 वर्षांवरील वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 15 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 10 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 7 हजार रुपये बक्षीस आहे.
3 कि.मी. धावणे गट
- 14 वर्षांखालील वयोगटासाठी (मुले आणि मुली) प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय (मुले आणि मुली ) 7 हजार, तृतिय (मुले आणि मुली) क्रमांकासाठी 5 हजार रुपये बक्षीस आहे.
- खुला वयोगटासाठी (पुरुष आणि महिला) प्रथम क्रमांक 10 हजार, द्वितीय (पुरुष आणि महिला) 7 हजार, तृतिय (पुरुष आणि महिला) क्रमांकासाठी 5 हजार रुपये बक्षीस आहे.
या मॅरेथॉनसाठी देशभरात कोणतेही स्पर्धक 10 कि. मी., 5 कि. मी. आणि 3 कि. मी. धावणेमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठीची नोंदणी 31 डिसेंबर 2024 पर्यंत करता येणार आहे. सहभागी स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र, टिशर्ट, किट बॅग व स्पर्धेनंतर नाश्ता देण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. स्पर्धेच्या मार्गावर पाणी आणि लोकमान्य रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. https://www.runindia.in/events/lokmanaya-marathon-run-for-education-2025-या संकेतस्थळाला भेट देऊन स्पर्धकांनी नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेतून नोंदणी प्रवेशिका भराव्या. अधिक माहितीसाठी 7795972635, टोल फ्री क्रमांक 1800 2124050 यावर संपर्क करावा, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.