चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हाहा:कार
कोरोनासारख्या आणखी एका व्हायरसने तोंड वर काढलंय. कोरोनानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये नवा व्हायरस पसरलाय. चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा व्हायरस वेगाने पसरतोय. संपूर्ण देशातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाय स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचा खच पडलाय. HMPV झाल्यानंतर ताप येतो, शिवाय याची लक्षणे कोरोना व्हायरस सारखीच आहेत.आरोग्य विभागातील सर्व अधिकारी चीनमधील परिस्थितीचे निरीक्षण करत आहेत.
लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो HMPV?
या विषाणू लहान मुले आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो. व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्क घालावे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आपले हात वारंवार स्वच्छ करत रहा, असंही आवाहन करण्यात आलंय.