लोकमान्य लिग स्पर्धेला प्रारंभ
सावंतवाडी, मॅनेजमेंट, गोवा, म्हापसा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई विजयी
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मर्यादित 15 व्या लोकमान्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवसी सावंतवाडी, तरूण भारत गोवा, मॅनेजमेंट, म्हापसा, बेळगाव विभाग, कोल्हापूर संघानी आपल्या प्रतिस्पर्धाना पराभव करून विजयी सलामी दिली.
युनियन जिमखानाच्या मैदानावर शनिवारी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण म्हणून लोकमान्य सोसायटीचे संचालक विठ्ठल प्रभू, गजनान धामणेकर, सुबोध गावडे, समत्वयक विनायक जाधव, पीआरओ राजू नाईक, सतीश गोडसे, उमेश कासेकर, भरम कोळी, कार्पोरेट संघाचे कॅप्टन अमर खणगावकर, मॅनेजमेंट संघाचे कॅप्टन गणेश कंग्राळकर यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात सोडून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी लोकमान्यचे एच.आर मॅनेजर जयेश पाटील, सीएसओ कर्नल दीपक गुरंग, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी.आर.पाटील यांच्यासह विविध संघांचे खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगाव, सावंतवाडी, गोवा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक येथील संघ सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या सामन्यात सावंतवाडी विरुद्ध बेळगाव यांच्या झालेल्या सामन्यात सावंतवाडी संघाने विजय मिळवला, सावंतवाडीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडीबाद 89 धावा केल्या. त्याला उतर देताना बेळगावने 8 षटकात 6 गडीबाद 52 धावाच केल्या. गोतम हेरर्लेकर याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात मॅनेजमेंट संघाने मडगावचा पराभव केला. मडगावने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडीबाद 53 धावा केल्या. त्याला उतर देताना मॅनेजमेंटने 6 षटकात 1 गडीबाद 54 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. परशराम गावड sयाना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तिसऱ्या सान्यात ने मुंबईने तरुण भारत गोवाचा पराभव केला. तरूण भारत गोवाने प्रथम फलंदाज करताना 8 षटकात 5 गडीबाद 55 धावा केल्या. त्या उतर देताना मुंबइsने 5.1 षटकात 2 गडीबाद 58 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथा सामन्यात म्हापसाने रत्नागिरी-सांगलीच पराभव केला, रत्नागिरी-सांगलीन प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडीबाद 41 धावा केल्या. त्याला उतर देताना म्हापसाने 4,1 षटकात 2 गडीबाद 42 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. जयेश याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पाचवया सामन्यात बेळगाव रिजनल ऑफिसने कॉर्पोरेटचा पराभव केला. सामन्यात बेळगाव रिजनल ऑफिस संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात बिन बाद 103 धावा केल्या. त्याला उतर देताना कॉर्पोरेटने 8 षटकात 4 गडीबाद 77 धावा केल्या. हा सामना 26 धावांनी बेळगावने जिंकला. अजय भोसले याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
कोल्हापूरने तरुण भारत गोवाचा पराभव केला. या सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडीबाद 109 धावा केल्या. त्याला उतर देताना तरुण भारत गोवाने 8 षटकात सर्व गडीबाद 92 धावाच केल्या. संग्राम चाबूक याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.