कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य युफोरिया-2024 सन्मान सोहळा थाटात

11:32 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ह्यूमन रिसोर्स विभागाकडून आयोजन : व्यवसाय, धोरणे आणि घडामोडींवर सखोल चर्चा

Advertisement

Advertisement

बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या ह्यूमन रिसोर्स (मनुष्यबळ) विभागाने युफोरिया हा वार्षिक कार्यक्रम दि. 21 व 22 जून रोजी आयोजित केला होता. दि. 21 रोजी सराफ गल्ली, शहापूर येथील हॉटेल समुद्रच्या सभागृहामध्ये प्रादेशिक व्यवस्थापकांच्या संमेलनामध्ये वार्षिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी व्यवसाय, धोरणे आणि घडामोडी यावर सखोल चर्चा करण्यात आली. संस्थेच्या ठेवींमध्ये वाढ आणि नाविन्यता याबद्दलही विचारविनिमय करण्यात आला.सायंकाळी नावगे येथील हॉटेल ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे युफोरिया-2024 हा सन्मान सोहळा पार पडला. उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या संचालक मंडळाच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर डीजे कार्यक्रम झाला.

22 जून रोजी संपूर्ण दिवस कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ट्रान्सव्हेन्शन्समधील ग्लोबल अतिथी अतुल गोयल यांनी संघबांधणी व सराव याबद्दलचे सत्र विविध खेळांच्या माध्यमातून रंगतदार केले. जेणेकरून सहकाऱ्यांमध्ये सांघिक भावना आणि परस्पर समन्वय वाढला गेला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात त्यांनी चित्रफीत आणि ध्वनिफितीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यानंतरच्या सत्रामध्ये विशेष योगदान देणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी झालेल्या लाईव्ह म्युझिक बँडने आणि त्यानंतरच्या सहभोजनाने उपस्थितांना प्रसन्न केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, डॉ. दामोदर वागळे, सई ठाकुर-बिजलानी, प्रितम बिजलानी, सीईओ अभिजीत दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले व इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article