लोककल्पतर्फे चिखले, कालमणी, माण शाळांतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स
12:04 PM Jul 31, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील चिखले, कालमणी व माण या गावांतील विद्यार्थ्यांना स्वेटर्स देण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशन कार्यरत आहे. फौंडेशनने खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. येथील विद्यार्थी आणि नागरिकांना लोककल्प फौंडेशनद्वारे विविध सोयी-सवलती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या हवेत गारठा असल्याने विद्यार्थ्यांचे शाळेला ये-जा करताना थंडीपासून संरक्षण व्हावे, या हेतूने स्वेटर्स देण्यात आले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article