For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी येथील रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

12:29 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी येथील रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल युनिट) यांच्या सहकार्याने कणकुंबी गावातील दोन रुग्णांची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. जगदीश पाटील आणि डॉ. अवधूत वाघळे यांनी केली. या उपक्रमात नेत्रदर्शनचे सहव्यवस्थापक उदयकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोककल्पचे अनिकेत पाटील आणि प्रितेश पोटेकर यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत नेत्रवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश होता. या उपक्रमामुळे रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा झाली असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयानी कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.