लोककल्प फौंडेशनतर्फे घोसे प्राथमिक शाळेला साहित्य वितरण
बेळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून लोककल्प फौंडेशनतर्फे घोसे (ता. खानापूर) येथील मराठी प्राथमिक शाळेला ग्रीन बोर्ड, बेंच, स्टडी टेबल, स्वेटर्स आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचा पुरवठा केल्यामुळे शैक्षणिक वातावरणामध्ये सुधारणा झाली असून या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला पूरक ठरणार आहे. या साहित्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आला असून ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता करणे हा उद्देश आहे. लोककल्प फौंडेशनतर्फे ग्रामीण भागात शिक्षण अणि प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले आणि उपयुक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी निरंतर कार्यरत आहे.