लोककल्प फौंडेशनतर्पे कुसमळी येथील रुग्णांची मोतिबिंदू मोफत शस्त्रक्रिया
बेळगाव : लोककल्प फेंडेशनतर्फे नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल (डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल) यांच्या साहाय्याने कुसमळी (ता. खानापूर) गावातील दोन ऊग्णांची मोफत मोतिबिंदू व पेटेरिजियम शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया डॉ. अवधूत वागळे यांनी केली. त्यांना नेत्रदर्शन हॉस्पिटलचे सहव्यवस्थापक उदय कुमार यांचे सहकार्य लाभले. लोककल्प फौंडेशनचे अनिकेत पाटील आणि किशोर नाईक हे संपूर्ण प्रक्रियेवेळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी, खानापूर तालुक्मयातील दत्तक घेतलेल्या गावांतील दुर्लक्षित व गरजू ऊग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. हा उपक्रम लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा झाली असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.