महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकायुक्त पोलिसांची तुरमुरी कचरा डेपोला भेट

10:11 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपाच्या अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत केल्या सूचना

Advertisement

बेळगाव : तुरमुरी येथील कचरा डेपोला लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांनी अचानक मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना कचरा डेपोकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट योग्यप्रकारे करावी, प्रदूषण होऊ नये याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मंगळवारी दुपारी अचानकपणे लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख तेथे दाखल झाले. सध्या या ठिकाणी रिसस्टेनेबिलिटी लिमिटेड कंपनी कारभार पाहत आहे. काही प्रकल्प अर्धवट आहेत. ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्या कंपनीवर सोपविण्यात आली आहे. बरीच कामे अर्धवट आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या परिसरामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. मनपाचे पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी येथील कामकाजाची माहिती दिली. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सर्व परिसराची पाहणी केली. त्यामध्ये असलेल्या त्रुटीसंदर्भात काही सूचना करण्यात आल्या. जे काम होणार आहे ते दर्जात्मक व्हावे. याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले. कचऱ्याचा साठा करताना नियोजन करावे, कचऱ्यावर प्रक्रिया करताना आधुनिक पद्धतीचा वापर करावा. जेणेकरून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल. याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुखांसह इतर अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article