For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकापूर रेल्वेस्थानक मालवाहतुकीसाठी खुले

11:37 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकापूर रेल्वेस्थानक मालवाहतुकीसाठी खुले
Advertisement

बेळगाव : मालवाहतूक सुरळीत होण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने लोकापूर रेल्वेस्थानक खुले केले आहे. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूर रेल्वेस्थानक यापुढे मालवाहतुकीसाठी ओळखले जाणार आहे. यामुळे मालवाहतूक करणे, मालाचा साठा करणे सुरळीत होणार आहे. या स्थानकातून ऊस, सिमेंट यासह इतर मालाची वाहतूक केली जाणार आहे. या रेल्वेस्थानकामुळे परिसरातील उद्योग व व्यापाराला चालना मिळणार आहे. परिसरात सिमेंट उत्पादन कंपन्या असल्यामुळे सिमेंटची ने-आण करणे सोयीचे ठरणार आहे. तसेच ऊस व साखर वाहतुकीसाठी मालवाहू रेल्वेची महत्त्वाची भूमिका ठरणार आहे.

Advertisement

मालवाहतुकीसाठी राखीव

पेट्रोल, तेल वगळता इतर सर्व मालाची वाहतूक याठिकाणाहून केली जाणार आहे. हे रेल्वेस्थानक मालवाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आल्याने बाजूच्या बेळगाव, विजापूर या जिल्ह्यामध्ये मालवाहतूक करणे सोयीचे ठरणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.