महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लोकमान्य’तर्फे लोक अनमोल आर्थिक योजना

11:28 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आकर्षक परताव्यासह विविध सुविधा : सभासदांना जास्तीत जास्त बचत करण्याची संधी

Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने आपल्या सभासदांना उत्कृष्ट परतावा देण्यासाठी खास ‘लोक अनमोल आर्थिक योजना’ 1 जूनपासून सुरू केली आहे. सदर योजना 31 ऑगस्ट 2024 या कालावधीतपर्यंत सक्रिय असेल. यामुळे सभासदांना जास्तीत जास्त बचत करण्याची संधी मिळेल.लोक अनमोल आर्थिक योजनेत सभासदांना ठेवींवर आकर्षक असा 10 टक्के व्याजदराचा लाभ घेता येईल. यामध्ये किमान दहा हजाराच्या गुंतवणुकीसह सहभागी होता येईल. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. तसेच जे सभासद एकाचवेळी 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करतील त्यांना अर्धा टक्का अधिक व्याजाचा लाभ मिळेल.

Advertisement

ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांनाही आधार देण्याचे महत्त्व ओळखून लोकमान्य सोसायटी त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक अर्धा टक्का अतिरिक्त व्याज देते, ज्यामुळे त्यांच्या परताव्यातही वाढ होते.लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर या योजनेच्या शुभारंभाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हणाले, ‘लोक अनमोल आर्थिक योजना आमच्या आदरणीय सदस्यांना सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षक परतावा आणि अतिरिक्त फायदे देऊन आम्ही आर्थिक समावेशाला चालना देत आहोत आणि आमच्या सदस्यांच्या विविध गरजा पूर्ण करत आहोत. आम्ही आमच्या सर्व सभासदांना एक उत्कृष्ट गुंतवणूक योजना देत आहोत’.

मुदतपूर्व ठेव काढण्याची सोय

लोक अनमोल आर्थिक योजनेबद्दल अधिक माहिती तसेच गुंतवणुकीच्या या उत्कृष्ट संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्ती शहरातील लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकतात. सोसायटीचे तज्ञ आर्थिक सल्लागार सभासदांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सर्वात योग्य गुंतवणूक पर्याय निवडण्यास मदत करण्यास तत्पर आहेत. तसेच टोल फ्री क्रमांक 18002124050 यावर कॉल करता येईल. सोसायटीच्या नियम व अटीनुसार लोक मान्सून योजनेत कर्जसुविधा योजनाही उपलब्ध आहे आणि मुदतपूर्व ठेव काढण्याची सोय आहे.

वचनबद्ध असलेली आघाडीची वित्तीय संस्था

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटी ही आर्थिक उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीद्वारे सदस्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक आघाडीची वित्तीय संस्था आहे. समृद्ध वारसा आणि बाजारपेठेतील मजबूत स्थानासह सोसायटीने 28 वर्षांहून अधिक काळ आपल्या सभासदांना उत्कृष्ट आर्थिक उपाय प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article