For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंद घर पुन्हा टार्गेटवर

03:48 PM Aug 26, 2025 IST | Radhika Patil
बंद घर पुन्हा टार्गेटवर
Advertisement

सांगली / विनायक जाधव :

Advertisement

जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात घरफोडी झाल्या होत्या. त्यानंतर सांगली पोलीसांनी अॅक्शन मोडवर येवून या घरफोडीचे सत्र थांबवत या घरफोड्या उघडकीस आणल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. या दोन आठवड्यात दररोज एकतरी घरफोडी झालेले चित्र सांगली जिल्हयात दिसून येत आहे. या घरफोडीचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखलही झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा घरफोडी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. बंद घरावरच चोरट्यांचे लक्ष असून पोलीसांचे त्याकडे दुर्लक्ष असू नये अशा सांगलीकरांच्या अपेक्षा आहेत. पोलीसांनी या घरफोडी उघडकीस आणण्यासाठी आणि या घरफोडी होवू नयेत यासाठी पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर येण्याची गरज आहे.

सध्या सणासुदीचा काळ आहे त्यामुळे बंद फ्लॅटवर विशेष लक्ष सांगली जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्रात वाढ होत आहेत. त्यामध्ये विशेष करून बंद फ्लॅटवर या चोरट्यांनी विशेष लक्ष दिले आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या मुळगावी बाहेर जात आहेत. यामुळे अनेक फ्लॅट बंद आहेत. हे बंद फ्लॅट लक्ष ठेवूनच मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत. जिल्हयात गुन्हेगारीने ज्या-ज्यावेळी डोके वर काढले आहे. त्या-त्यावेळी सांगली पोलीसांनी या गुन्हेगारांना अक्षरशः ठेचून काढले आहे. सांगली नागरी वस्तीसाठी सुरक्षित शहर आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा एकदा घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विश्रामबाग, सांगली ग्रामीण, सांगली शहर, संजयनगर आणि कुपवाड परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोडी झाली आहे. याशिवाय तालुका असणाऱ्या कडेगाव, मिरज, विटा, तासगाव, इस्लामपर याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत या वाढणाऱ्या घरफोडीमध्ये विशेषतः फ्लॅट फोडले जात आहेत. याचे कारण म्हणजे अपार्टमेंटमध्ये एकमेकांच्च्या फ्लॅ टकडे असणारे दुर्लक्ष होय. अपार्टमेंटमध्ये कोण येते याची कोणतीही माहिती शेजारा पाजाऱ्यांना नसते. त्यामुळे या घरफोडी करणाऱ्यांचे फावते. चोरटे सहजपणे फ्लॅटमध्ये शिरून चोरी करून जातात. ज्यावेळी फ्लॅटमालक परत येतात तेव्हाच फ्लॅट फोडल्याचे समजते. त्याच्या आधी अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांना समजत नाही. हे दुदैव आहे.

Advertisement

पोलीसांनी सांगली शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोम्बींग ऑपरेशन सारखी कडक मोहिम राबविली नाही. ती मोहिम राबविण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक भागात पोलीसांचा वावर सातत्याने दिसला पाहिजे. त्यामुळे आपोआपच अनेक गुन्हेगार पोलीसांच्या नजरेत तात्काळ येवू शकतात. त्याचा योग्य परिणाम म्हणजे हे गुन्हे कमी होण्यास होवू शकतो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कोम्बींग ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामध्ये हे चोरटेही त्यांना सहजपणे मिळू शकतात.

  • नागरिकांकडूनही दक्षतेची गरज

सांगलीत घरफोड्या होत आहेत. त्याची माहिती सर्वांना होत आहे. त्याच्या चवीष्ठपणे चर्चाही होत आहेत. पण आपल्या घराची सरक्षितता बाळगण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. अनेक कोण येते याचा काहीही अपार्टमेंटमधील नागरिकांना आपल्या परिसरात येणारे संशयिताबाबत काहीही चर्चा होत नाही. अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही हे अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत. त्यामुळे त्या सीसीटीव्हीचा असूनही काही उपयोग होत नाही.

  • पोलीसांना बाहेर जाताना माहिती देणे गरजेचे

अनेक अपार्टमेंटमध्ये फ्लॅट बंद असतात. त्यामुळे त्याची माहिती जर पोलीसांना प्राप्त झाली तर या भागात सातत्याने गस्त सुरू ठेवता येवू शकते. याशिवाय अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या लो-क्वॉलिटीच्च्या सीसीटीव्हीमुळे अनेकवेळा चोरट्यांचे चेहरे ओळखू येत नाहीत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही लावण्यात यावेत व हे सीसीटीव्ही अपार्टमेंटच्या सर्वभागात असल्यास चोरटे कोठूनही आले तरी त्याची माहिती पोलीसांना सहजपणे मिळू शकते. तसेच रस्त्यावरीलही सीसीटीव्ही आणि परिसरातील सीसीटीव्ही सुरू आहेत की नाही याची माहिती घेण्याची गरज आहे. पण त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाहेर जात असताना पोलीसांना माहिती दिल्यास पोलीस या भागात निश्चित गरत घालू शकतात.

  • एका तर घराची कौले उचकटून घरफोडी

सांगलीतील एका उपनगरात एक घरफोडी तर चोरट्यांनी सर्वांच्यावर मजल मारून केली आहे. हे बंद घर फोडण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. थेट चोरट्यांनी या घराची बाजूची कौले काढून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात असणारे सर्व मौल्यवान साहित्य चोरी केले आणि तो पुन्हा जसा कौले काढून आत गेला होता. तसाच परत वर आला आणि चोरी करून पळून गेला. घराची मालकीण आल्यावर तिला घर फोडल्याचे दिसले पण घराचे कुलुप तर व्यवस्थित आहे. त्यावेळी तिने वर पाहिले त्यावेळी घराची कौले काढलेली दिसली आणि मग तिने तात्काळ पोलीसांना याची माहिती दिली आणि पोलीसांनी येवून या चोरीचा तपास सुरू केला.

Advertisement
Tags :

.