For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुळजापुरात शासकीय कार्यालयांना टाळे ठोकले; आंदोलकांकडून रस्ता रोको करून नेत्यांचे जाळले पुतळे

05:42 PM Oct 31, 2023 IST | Abhijeet Khandekar
तुळजापुरात शासकीय कार्यालयांना टाळे ठोकले  आंदोलकांकडून रस्ता रोको करून नेत्यांचे जाळले पुतळे
Advertisement

तुळजापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी तुळजापूरकरांचे शासकीय कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आली यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे प्रतितात्मक पुतळे करून जाळण्यात आले. घोषणाबाजी करून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासकीय कार्यालयात चालू देणार नाही असा पवित्रा मराठा समाज बांधवांनी घेतला होता.

Advertisement

सकाळी दहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जमा होण्यास सुरुवात झाली. तसेच इतर ही समाजातील समाज बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणाबाजीने छत्रपती शिवाजी चौक दणदणून निघाला. सरकार आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक पुढार्‍यांचा विरोध आणि निषेध या ठिकाणी करण्यात आला. तसेच आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या खासदार आणि आमदारांचे यावेळी अभिनंदन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून मराठा बांधवांच्या रॅलीस सुरुवात झाली ही राहिली सर्वप्रथम पंचायत समिती कार्यालयात गेली आणि पंचायत समितीला टाळे ठोकले. त्यानंतर नगरपरिषद आणि तहसील कार्यालयाला देखील टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर ही रॅली जुने बस स्थानक समोर असणाऱ्या चौकात आली आणि या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. घोषणाबाजी आणि अनेक समाज बांधवांनी भाषणे केली. त्यानंतर जमलेल्या मोठ्या संख्येने समाज बांधवांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे प्रतितात्मक पुतळे जाळण्यात आले जाळल्यानंतर घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणदणून गेला.

आंदोलनाला मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन पार्टीच्या वतीने या पाठिंबा देण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Advertisement

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी मराठा समाज बांधव आणि राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज जिरंगे पाटील यांना मंहतानी दिले तुळजाभवानीचे चरण तीर्थ 
श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य मंहत तुकोजी बुवा यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून आई तुळजाभवानी मातेचे चरण तीर्थ अंतरवली येथे जाऊन जिरंगे पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन आई भवानीचे चरण तीर्थ त्यांना दिले आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे असा आशीर्वाद महंत तुकोजी बुवा यांनी जिरंगे पाटलांना दिला यावेळी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी उपस्थित होते

Advertisement
Tags :

.