महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लोबो काँग्रेसमध्ये जाताना एकटे गेले, भाजपात येताना सातजणांना आणले!

12:49 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, लोबोंचा 48 वा वाढदिवस उत्साहात साजरा, आमदार, मंत्री,कार्यकर्त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

Advertisement

म्हापसा : कळंगुटचे आमदार मायकल लोबो लोकांसाठी सदैव कार्य करीत असतात, मग येथे असो वा तेथे. लोक त्यांना भरघोस मतांनी निवडूनही देतात. येणारे दिवस मायकलसाठी चांगले दिवस असणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे बोलताना केले.लोबो भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले खरे, पण आपल्यास त्याची भीती वाटली नाही. काँग्रेसमध्ये जाताना तश एकटेच गेले, पण येताना अन्य 7 जणांना भाजपात घेऊन आले ही त्यांची सकारात्मक बाजू आहे. ते मतपरिवर्तन करण्यास कुणालाही ऐकत नाही. कुणाचे मतपरिवर्तन कसे करावे हे मायकलकडून शिकावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या 48 व्या वाढिदनी त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत, रेजिनाल्ड आलेक्स, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, पर्रा सरपंच चंदानंद हरमलकर, उपसरपंच डॅनिअल लोबो, माजी आमदार किरण कांदोळकर, आमदार केदार नाईक, दाजी साळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

दै. तऊण भारतचे समूहप्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकूर,संपादक सागर जावडेकर यांनी आमदार मायकल लोबो यांच्या निवासस्थानी जाऊन लोबो यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, एक थेट बोलणारे जे दिसते ते बोलणारा, एखादा विषय जर जनतेचा असेल तर लोक त्याला काय म्हणणार याचा विचार न करता स्वत:हून तो विषय सोडवून घेणे,ही लोबो यांची खासियत आहे. विकासकामात मायकल लोबो सदैव कार्यरत असतात. याप्रंसगी सुभाष फळदेसाई म्हणाले की, मायकल लोबो हे राजकारणातले आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व असून गोव्याच्या राजकारणात त्यांनी एक वेगळा ठसा उमटला आहे. आमदार दिगंबर कामत, आमदार संकल्प आमोणकर, आलेक्स रेजिनाल्ड, डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनीही लोबो यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article