For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी

06:55 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी
Advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन : भाजपसह पंतप्रधान मोदींना केले लक्ष्य, भाजपला केवळ श्रीमंतांचा विचार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भाजप फक्त श्रीमंतांच्या बाजूने विचार करत असून गरिबांची त्यांना पर्वा  नाही. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास सर्वसामान्यांच्या विकासाला अधिक प्राधान्य देऊ. याचबरोबर अवैज्ञानिक जीएसटी प्रणालीत सुधारणा केली जाईल. अन्नपदार्थांवरील कराचा बोजा हटविण्यासह स्वामीनाथन अहवालाप्रमाणे वैज्ञानिक आधारभूत किंमत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिले.

Advertisement

मंड्या विद्यापीठ परिसरात आयोजित प्रजाध्वनी यात्रा-2 कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. देशाची संपत्ती मोजक्मया व्यक्तींमागे जमा होत आहे. पैसा असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचे कार्यक्रम फायदेशीर आहेत. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर अशास्त्रीय करप्रणालीचा आणखी बोजा पडत असल्याची टीका त्यांनी केली.

राहुल गांधी पुढे म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख ऊपयांची आर्थिक मदतीची महिला न्याय, प्रत्येक सुशिक्षित तऊणाला पहिल्या नोकरीच्या गॅरंटीसह एक लाख ऊपये पगार, जात जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची अंमलबजावणी, ग्रामीण रोजगार हमी योजनेचे दैनंदिन वेतन 400 रुपयांपर्यत वाढ करण्यासह अनेक योजना काँग्रेस राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक विधानसभेतील आश्वासनांची पूर्तती

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी काँग्रेस सरकारने यशस्वीपणे केली आहे. काँग्रेस पक्ष दिलेल्या आश्वासनानुसार काम करेल. आम्ही लोकांची दिशाभूल करण्यासाठी आश्वासने देत नाही, आश्वासने देऊन ती न चुकता पूर्ण करतो. पण भाजप आपल्या म्हणण्यानुसार वागत नाही. निवडणुकीच्या वेळी लोकांची भावनिक दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर लोक त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात एक ना एक समस्या सहन करतात. नोटा रद्द करणे आणि लोकांवर बोजा टाकणाऱ्या करप्रणालीसह अनेक आर्थिक समस्या निर्माण केल्याबद्दल राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर

निवडणूक बॉण्डच्या मुद्यावर पंतप्रधान आतापर्यंत मौन बाळगून आहेत. आयकर, अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून निवडणूक रोख्यांची विक्री करण्यात आली आहे. भाडेतत्त्वाच्या मोबदल्यात बॉण्ड्स खरेदी करण्यात आले. हे भ्रष्टाचाराचे स्पष्ट प्रकरण असून काँग्रेसची सत्ता आल्यावर चौकशी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भाजपच्या अनेक खासदार आणि नेत्यांनी घटना बदलाबाबत विधाने केली आहेत. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही आणि संविधान धोक्मयात येईल. मोदी सरकारने लोकशाहीचा पायंडा पाडून मोठा अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कृषिमंत्री चलुवरायस्वामी, आमदार रमेश बंडिसिद्धेगौडा, पी. एम. नरेंद्रस्वामी, उदय, गणिग रवि, विधानपरिषद सदस्य दिनेश गुळीगौडा आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.