For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानने सर्व अटी पूर्ण केल्यानेच कर्ज

07:00 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानने सर्व अटी पूर्ण केल्यानेच कर्ज
Advertisement

वृत्तसंस्था/न्यूयॉर्क

Advertisement

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला देण्यात आलेल्या बेलआउट पॅकेजचा बचाव केला आहे. भारताच्या आक्षेपानंतरही आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचा (जवळपास 8 हजार कोटी रुपये) नवा हप्ता जारी केला होता. पाकिस्तानने हा हप्ता प्राप्त करण्यासाठी जवळपास सर्व आवश्यक लक्ष्यांना पूर्ण केले असल्याचे आयएमएफने म्हटले. पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांवर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई केली असताना आयएमएफकडून पाकिस्तनाला कर्जाचा हप्ता जारी करण्यात आला होता.

पाकिस्तान या कर्जाचा वापर दहशतवादाला बळ पुरविण्यासाठी करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानला 2.1 अब्ज डॉलर्सच्या मदतनिधीवर पुनर्विचार करावा, कारण पाकिस्तान स्वत:च्या भूमीवरून भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया घडवून आणत असल्याचे भारताने म्हटले होते.  पाकिस्तानला ही रक्कम आयएमएफच्या विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमाच्या अंतर्गत दोन हप्त्यांमध्ये जारी करण्यात आली आहे.

Advertisement

आयएमएफचे स्पष्टीकरण

पाकिस्तानने वित्तसहाय्यासाठी निर्धारित सर्व अटींची पूर्तता केली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत काही सुधारणा झाल्या असून याच आधारावर कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली. आयएमएफचे वित्तसहाय्य केवळ देयक संतुलनाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आहे. पाकिस्तानला देण्यात आलेली सर्व ईएफएफ रक्कम थेट मध्यवर्ती बँकेकडे जमा होते. या निधीचा वापर सरकारी अर्थसंकल्पासाठी केला जात नाही, असे स्पष्टीकरण आयएमएफच्या संचार संचालिका जूली कोजॅक यांनी दिले. ईएफएफच्या पहिल्या समीक्षेसाठी मार्च 2025 मध्ये स्टाफ स्तरावर पाकिस्तान आणि आयएमएफ यांच्यात करार झाला होता, ज्याला 9 मे रोजी आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली. यानंतर पाकिस्तानला हा हप्ता जारी करण्यात आला.

Advertisement
Tags :

.