आईच्या मृतदेहासह 10 वर्षांपासून वास्तव्य
या कारणाने लावला नव्हता हात
जपानमध्ये 10 वर्षांपर्यत स्वत:च्या आईच्या मृतदेहाला फ्लॅटमध्ये लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली एका इसमाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्याला संशय वाटल्यावर पोलिसांना या विचित्र प्रकरणाची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी फ्लॅटची तपासणी केली असता टॉयलेटमध्ये सांगाडा आढळून आला.
पोलिसांनी एका 60 वर्षीय इसमाला स्वत:च्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो फ्लॅटमध्ये लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्या 95 वर्षीय आईचा मृतदेह 10 वर्षांपर्यंत फ्लॅटमध्ये पडून होता. माझ्या आईचा मृत्यू एक दशकापूर्वी झाला होता हे मला माहित होते. परंतु सामाजिक भयामळे (सोशल एंजायटी) याची माहिती दिली नाही असे आरोपी ताकेहिसा मियावाकीने पोलिसांना सांगितले आहे. ताकेहिसाला एक प्रकारची सोशल एंजाइटी झाली होती.
संशयाच्या आधारावर चौकशी
मियावाकी बेरोजगार आहे, मध्य जपानच्या ह्योगो प्रांतातील कोबे शहरात एका लोकसेवकाने मियावाकीला रस्त्यावर लंगडत चालताना पाहिले होते. सरकारी अधिकाऱ्याने त्याची वैयक्तिक माहिती आणि त्याच्या आईविषयी विचारले असता मियावाकीने काहीही सांगण्यास नकार दिला. यामुळे अधिकाऱ्याला संशय आला, यानंतर अधिकाऱ्याने स्थानिक पोलिसांना कळविले होते. जून महिन्यात मियावाकीच्या आईच्या नावावर नोंदणीकृत घरात तपासणी करण्यासाठी पोलीस गेले असता फ्लॅटमध्ये कचऱ्याचा ढिग दिसून आला, त्यानंतर टॉयलेटमध्ये एक सांगाडा मिळाला.
टॉयलेटमध्ये गेला होता जीव
सुमारे 10 वर्षांपूर्वी माझी आई याच टॉयलेटमध्ये अखेरचा श्वास घेताना आढळून आली होती. यानंतर तिचे शरीर थंड पडत गेले. एका साधारण व्यक्तीच्या स्वरुपात माझ्या आईचे निधन झाल्याचे मला ठाऊक होते. मी पोलिसांना फोन केला नाही तसेच रुग्णालयाशी संपर्क साधला नाही. तर स्वत:च्या आईच्या मृतदेहाला तसेच ठेवून दिले. मला सोशल एंजायटी असल्याने मी पोलिसांना कळवू शकलो नाही असे मियावाकीचे सांगणे आहे.
डीएनए चाचणीतून पुष्टी
जुलैच्या प्रारंभी कोबे शहरात पोलिसांनी डीएनए परीक्षणातून मृतदेह मियावाकीच्या आईचा असल्याची पुष्टी दिली. तसेच त्यांची हत्या झाल्याचा पुरावा मिळालेला नसल्याचे सांगत याप्रकरणी तपास केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.