ब्रिटनमध्ये विद्यार्थ्यांसमोर ‘लिव्हिंग क्रायसिस’
9 टक्क्यांनी वाढली महागाई : घरभाडे देणे ठरले अशक्य रस्त्यावर झोपण्याची वेळ
ब्रिटनमध्ये 9 टक्क्यांनी महागाई वाढल्याने तेथील विद्यार्थ्यांसमोर लिव्हिंग क्रायसिस उभे ठाकले आहे. या विद्यार्थ्यांना घरभाडे देता येत नसल्याची स्थिती आहे. तर नातेवाईकांकडे राहत असलेल्या विद्यार्थ्यांना वाढत्या महागाईमुळे अन्यत्र व्यवस्था करण्यास सांगण्यात आले, अशा स्थितीत काही विद्यार्थ्यांवर रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली आहे.
कुणी स्वतःच्या मित्रांकडे जाऊन राहतोत, तर कुणी पार्टटाइम जॉब शोधतोय. सुमारे 12 टक्के विदेशी विद्यार्थ्यांकडे कुठलाच निवारा नाही. 5.3 टक्के ड्रॉप आउट आणि अलिकडेच पासआउट झालेले विद्यार्थीही या समस्येला तोंड देत आहेत. हा खुलासा हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टीटय़ूटमध्ये प्रकाशित झालेल्या नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट इन स्कॉटलंडच्या सर्वेक्षणाद्वारे झाला आहे. कपाळावर छतच नसल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणे अवघड ठरले असून ते मानसिक तणावाला तोंड देत आहेत.
उन्हाळय़ात सर्वात अधिक त्रास विदेशी विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी शहरांमध्ये राहत असलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना होतोय. यंदा महागाई वाढल्याने विद्यार्थ्यांसाठी वास्तव्यासह भोजन आणि विजेचे वाढलेले दरही त्रासाचे कारण ठरले आहेत.
अनेक विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना हा त्रास होतोय, परंतु विद्यापीठांकडून कुठलीच व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी केली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्वतःचा अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी अधिक तणावाला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त मदत करण्यावर विचार करावा असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.