For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

 पशुधन विकास अधिकाऱ्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

01:48 PM Jan 11, 2024 IST | Kalyani Amanagi
 पशुधन विकास अधिकाऱ्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या
Advertisement

कुर्डुवाडी प्रतिनिधी

Advertisement

पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डुवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्तव्यावर असताना कार्यालयातील छताच्या लाकडी वाश्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.१० रोजी सकाळी ९ ते दु ४ वा. दरम्यान घडली.
विश्वनाथ चिमाजी जगाडे (वय ३९ मुळ रा.परभणी सध्या कुर्डुवाडी ता.माढा) असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून कुर्डुवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पशुधन विभागात ते पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. बुधवार दि. १० रोजी सकाळी ९ ते दु.४ वा.दरम्यान त्यांनी कार्यरत असलेल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यालयातील छताच्या लाकडी वाश्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खासगी पशु वैद्यांनी येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. आत्महत्येबाबत मात्र नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांना शासकीय कामाचा अधिक ताण होता अशी चर्चा पशु वैद्यकीय विभागात दबक्या आवाजात सुरु होती. गुरूवारी सकाळी सोलापुर येथील सोलापुर जि.परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डाॅ.नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. कुर्डुवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई,वडिल, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.