For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारदग्यात आज होणार साहित्याचा जागर

06:33 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारदग्यात आज होणार साहित्याचा जागर
Advertisement

30 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : विविध मान्यवरांची लाभणार उपस्थिती

Advertisement

वार्ताहर/ कारदगा

येथे साहित्य विकास मंडळातर्फे आज 30 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली 30 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरत आहे. दूधगंगा नदीकाठावरील समृद्ध गाव अशी ओळख असलेल्या या खेड्याची आता साहित्यातूनही वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे.

Advertisement

जिथे विचारांचा जागर असतो, तिथे साहित्याची वस्ती असते आणि जिथे साहित्याची वस्ती असते तिथे कोणतीच व्यक्ती ही एकटी नसते. अशीच ही साहित्यभूमीची वस्ती कारदगा गावास लाभली. सौंदर्याची गंगा ही संस्कृतीच्या रुपात दिसली. या द्विगुणीत पैलूंचे हास्य प्रत्येक व्यक्तीच्या ओठावरती पहावयास मिळते. हे खरंच तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्य म्हणावे लागेल. संस्कार, साहित्य, कला आणि व्यक्तिमत्व या चौफेर अभिनयातील व्यक्ती ही या गावी जन्म घेते. येथे प्रत्येक श्वासाश्वासात विचारांची साथ मिळते.

येथे केवळ व्यक्तीची नव्हे तर व्यक्तिमत्वाची पूजा केली जाते. म्हणून साहित्याची व्याप्ती प्रदीर्घ झाली आहे. यातून जगण्याची कला आणि कलेस कलाटणी मिळवून देण्यास प्रत्येक व्यक्तीचा वेध हा साहित्यिक दृष्टिकोनातूनच हवा. कारण रोजची आधारभूत तत्वे, कालची मेहनत व भविष्यातील स्वप्ने हा त्रिसूत्र आधारित साहित्याचा विकास होणे अगदी तितकाच महत्त्वाचा आहे.

या साहित्य प्रवाहातील विचार, श्रद्धा, काळ, सातत्य, आत्मा, मन व प्रेम आणि यातील कार्यक्षेत्र हा इतका अनंत असावा की जिथे कुठे त्याला किनाराही नसावा. यासाठीच की, वृक्षाचा वटवृक्ष होण्यास क्षणाचा नव्हे तर क्षणाक्षणांचा विचार करावा लागतो. अगदी याचप्रमाणे साहित्याचा विकास होणे हेही गरजेचे वाटते. यासाठी विचारा-विचारांची एकमेकांनी सहमती दर्शविणे अगदीच महत्त्वाचे आहे. अन् याचीच एक पोहोचपावती कारदग्याच्या सर्व माणसापर्यंत पोहोचलेली आहे. अगदी साहित्य संमेलन विकासाच्या रुपानेच सर्वांच्या मनामनापर्यंत पोहोचले आहे. हे साहित्याचे वटवृक्ष आज नव्या रंगात दिसत आहे. याचा सार्थ अभिमान कारदगावासियांना आहे.

30 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ यशवंत पाटणे सातारा, यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे.  संमेलन पाच सत्रात होत आहे. सकाळी 8 ते 9.30 यावेळेत जोतिर्लिंग मंदिर ते संमेलन स्थळ ग्रंथदिंडीचे आगमन होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र सकाळी 10 ते 1 पर्यंत असून महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रतिमा पूजन अण्णासाहेब हवले, दीपप्रज्वलन गणपतराव पाटील, व्यासपीठाचे उद्घाटन डॉ. एस. बी. शिंदे, साहित्य नगरीचे उद्घाटन भरत बाळासाहेब माणगावे यांच्या हस्ते होणार आहे.  खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, माजी उर्जा मंत्री वीरकुमार पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, प्रदीपराव जाधव, सुप्रिया पाटील, सुमित्रा उगळे, दादासो नरगट्टे, देवाप्पा देवकत्ते, राजू खिचडे, नितेश खोत, अरविंद खराडे, डॉ. अभिनंदन मुराबट्टे, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्वागत अध्यक्षा कारदगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा स्वाती  कांबळे करणार आहेत.

वसंतराव गायकवाड यांच्या हस्ते  प्रा.डॉ. अच्युत माने निपाणी यांचा स्मरण यात्रा व संजय अवघडी यांचा अमृतधारा धर्म अध्यात्म आणि जीवनमूल्ये या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. दुसऱ्या सत्रात मा. आलोक जत्राटकर जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे शिक्षण समाज आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान, तिसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर अहिल्यानगर यांचा ‘क‘ कथेचा! विनोदी कथाकथनाची मेजवानी सादर होणार आहे. चौथ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कवींचा कविता नाती- मातीच्या कविता रितीभातीच्या कवी संमेलनाचा कार्यक्राम होणार आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध कवी-डॉ. केशव खटींग हिंगोली, नितीन चंदनशिवे कवठेमहांकाळ, संतोष नारायणकर परभणी हे कवी सहभागी होणार आहेत. निवेदन विजय काळे कारदगा-कागल करणार आहेत.

प्रमुख पाहूण्यांचा परिचय  

डॉ. अलोक जत्राटकर हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते शिक्षण समाज आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कोल्हापुरच पर्यटन या पुस्तकाचे सहलेखक. ब्लॅक व्हाईट अन ग्रे, समाज आणि माध्यमं ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. संजय कळमकर यांनी सारांश शून्य, झुंड, चिंब, दु:खाची स्वगते, बे एके बे, मी मेलो त्याची गोष्ट अशा सकस कादंबरींचे लेखन केले आहे. त्यांची व्याख्यान ऐकताना श्रोता हसताहसता कधी अंर्तमुख होऊन जातो हे त्याचे त्यालाही काळात नाही.

डॉ. केशव खटींग यांचा सालोसाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यास महाराष्ट शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. नितीन चंदनशिवे हे सध्या आघाडीचे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कुवेत, रशिया, ऑस्ट्रेलिया, केम्ब्रिज आणि लंडन या देशात सुद्धा कवितेचे सादरीकरण आणि व्याख्यान झाले आहे. त्यांना आतापर्यंत एकूण 75 पुरस्कार मिळाले आहे. संतोष नारायणकर यांच्या यांच्या कवितेत लोकपरंपरा, संतसाहित्य आणि आधुनिक कवितेतील मूल्ये एकत्रित आलेली आढळतात. विजय काळे हे अनेक राज्यस्तरीय वत्तृत्व स्पर्धेचे विजेते कवी संमेलनाचे निवेदक, व्याख्याते आणि राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

प्रा. डॉ. यशवंत पाटणे हे महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त वत्ते आहेत. दिसामाजी काहीतरी ते लिहावे‘ या समर्थाच्या आज्ञेस अनुसरून ‘रविवार सकाळ’ साठी त्यांनी नित्य नव्या जागृतीचे पान अक्षर संपन्न केले. त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार. प्रा. शिवाजीराव भोसले स्मुर्ती पुरस्कार पुणे, आम्ही सातारकर प्रतिष्ठान मुंबई सातारा रत्न पुरस्कार यासह अन्य पुरस्कार मिळाले आहेत. नामदार प्रकाश आबिटकर हे महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री आहेत. त्यांना पुढारी, सकाळ, युथआयकॉन पुरस्कार प्राप्त. आदर्श आमदार पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील आघाडीचे मंत्री आहेत.

Advertisement
Tags :

.