For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव साहित्य संमेलनात उद्या साहित्यिकांची मांदियाळी

10:13 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव साहित्य संमेलनात उद्या साहित्यिकांची मांदियाळी
Advertisement

22 व्या  साहित्य संमेलनातील मान्यवरांचा परिचय

Advertisement

उचगाव मराठी साहित्य अकादमीतर्फे 22 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 14 जानेवारी रोजी होत आहे. मराठी भाषेवरील प्रेम, जिव्हाळा वाढवा आणि भाषा संवर्धन व संस्कृतीसाठी हा साहित्य जागर होत आहे. नववर्षाच्या प्रारंभी अनेक दिग्गज वक्ते, कवी, कादंबरीकार, कथाकार, समीक्षक व लोककलावंत यांच्या व्याख्यानातून समाजप्रबोधन होणार आहे. यासर्वांचा परिचय खालीलप्रमाणे...

संमेलनाचे अध्यक्ष- मान. प्रा. लक्ष्मण महादेवराव महाडिक

Advertisement

बी. के. कावळे कनिष्ठ महाविद्यालय, कादवा पिंपळगाव ता. निकाड, जि. नाशिक येथे मराठी विषयाचे अध्यापक ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त. विविध विषयावर आभ्यासपूर्ण व व्यासंगपूर्ण व्याख्याने. कथाकथनकार म्हणून परिचित. कथा कविता, एकांकिका, ललित प्रासंगिक समीक्षा व इतर विपुल लेखन केले आहे. ‘कुणब्याची कविता’ हा काव्यसंग्रह 2004 मध्ये प्रकाशित. ‘स्त्रीकुसाच्या कविता’ स्त्री जाणीव व्यक्त करणारा काव्यसंग्रह 2021 साली प्रसिद्ध. धुक्यातले ‘मुके दिवस’ ललित प्रकाशनाच्या वाटेवर तसेच आगामी काळात ‘कुणब्याची कुंडली’ मांडताना शेती आणि शेतकरी जाणीव व्यक्त करणारा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या  वाटेवर. स्तंभलेखन, आकाशवाणी नाशिक केंद्रावरून श्रुतिका लेखन, विविध नियतकालिकातून प्रासंगिक लेखन केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा 2016-17 चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित तसेच 2003 सालचा नाशिक जिल्हा परिषदेचा कनिष्ठ महाविद्यालय विभागातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

 उपक्रम

राज्यभर विविध व्याख्यानमाला, विविध सार्वजनिक वाचनालये, शैक्षणिक संस्थामध्ये व्यासंगपुर्ण व्याख्याने, कथाकथन, काव्यवाचन केले आहे. दूरदर्शनच्या विविध मराठी वाहिन्यावरून कार्यक्रमाचे सादरीकरण. शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर ‘भारुड’ लघुपटाचे संहिता, संवाद गीत लेखन. ‘गांधारीचे डोळे’ या टीव्ही मालिकेचे शीर्षक गीत लेखन विविध राज्यस्तरीय कृतीसत्रात संशोधन निबंध सादर. राज्य व जिल्हास्तरावर ‘मास्टर ट्रेनर म्हणून काम. गावोगावी जाऊन कार्यक्रम करून ‘गरिबी विद्यार्थी फंड’ उभारून अनेक गरजू मुलांना मदत मातृभाषा दिन पत्रलेखन उपक्रमाची वर्डरेकॉर्ड बुकात नोंद झाली आहे.

दुसरे सत्र

संतसाहित्यावर आधारित कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर कार्यक्रम सादर करतील.

ह. भ. प. ज्ञानेश्वर माउली (महाराज) पठाडे कर्जतकर

हे एक महाराष्ट्रातील नामवंत युवा वारकरी कीर्तनकार व समाजप्रबोधनकार आहेत. 1 ऑगस्ट 1997 ला महाराजांचा जन्म मु. अळसुदे ता. कर्जत जि. अहमदनगर येथे वारकरी सांप्रदयाचा वारसा महाराजांना घरातूनच मिळाला आहे. महाराज मराठी विषयामध्ये एम. ए असून एक क्रियाशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कर्जत येथे भव्यदिव्य श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबारायांचे मंदिर निर्माण करून मंदिरासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची स्थापना करून भव्य संस्थान निर्माण केले. 2004 पासून 17 वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरू आहे. आजपर्यंत 5 हजार पेक्षा जास्त कीर्तनाचे कार्यक्रम करून युवक घडविण्याचे काम महाराज करत आहेत. झी टॉकीज वाहिनीवर 15 वेळा कीर्तन करून वारकरी संप्रदयाचा प्रचार केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराज घराघरात पोहचले आहेत.

तिसरे सत्र

‘हास्यकवी संमेलना’तील कवीचा परिचय  ‘हास्यशिरोमणी’

नितीन वरणकर-शेगाव बुलढाणा (मुख्याद्यापक, संग्रामपूर जि. पं. बुलढाणा)

शेग्गाव येथे झालेल्या चौथ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड. 2019 ला मुंबई दूरदर्शनवरून धुलिवंदननिमित्त कार्यक्रम पसारित एबीपी माझावर व मुंबई दूरदर्शन 2022-2023 ला कार्यक्रम प्रसारित.

‘दालतडका’ व ‘फोळणी’ या नावाने सरांचे स्तंभलेखन. अनेक विनोदी कथा, कविता, दिवाळी अंकात प्रसिद्ध. आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 800 पेक्षा जास्त कार्यक्रम सादर. 36 वेळा रक्तदान केलेले आहे. या सामाजिक कार्यासाठी भी. छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित.

 प्रा. अरुण पवार (परळी वैजनाथ, जिल्हा बीड)

नव्या दमाचे कवी म्हणून यांचा महाराष्ट्रातील अनेक निमगीत कवी संमेलनात सहभाग. एबीपी माझा, टीव्ही-9, साम टीव्ही, सह्यांद्री वाहिनीवरून कविता वाचन तसेच परभणी, जळगाव, बीड, नांदेड येथे आकाशवाणीवरून कविता वाचन. अखिल भारतीय साहित्य संमेलन औरंगाबाद, उस्मानाबाद, यवतमाळ, उदगीर, सासवड, मुंबई या ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून सहभाग.

अनेक पुरस्काराने सन्मानित-

बीड जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित, कवी मंगेश पाडगावकर पुरस्कार शेगाव, पुणे येथील काव्य प्रतिभा पुरस्कार, रोटरी भूषण पुरस्कार-गंगखेड- परळीचा न महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-परळी, नवीन शैक्षणिक धोरणात आदर्श सुलभक म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित. दोन कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या उंबरट्यावर. बोली भाषेतील ‘झावळ’ हा कविता संग्रह काही दिवसात प्रकाशित होत आहे.

हास्यकवी

शरद तुकाराम धनगर (मु. पो. करणखेडे, ता. अमळनेर, जि. जळगाव)

मराठी आहिराणी भाषेत कविता व गझल लेखन केले आहे. डीएड पदवीधर असून व्यवसाय शेती आहे. 89 वे आ. भा. मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे काव्यवाचनासाठी सहभाग. 5 व्या अ. भा. आहिराणी साहित्य संमेलन धुळे येथेही निमंत्रित कवी म्हणून सहभाग. 55 व्या आ. भा. अंकुर मराठी साहित्य संमेलन आकोल येथे सहभाग. 90 वे आ. भा. मराठी साहित्य संमेलन डेंबीवली येथे गझलकार म्हणून आमंत्रित. 2017 ते 2021 यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान आंबेजोगाई आयोजित कवी संमेलनात सहभाग, जय महाराष्ट्र, साम मराठी वृत्तवाहीनीवर मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित काव्य संमेलनात सहभाग. सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या 2023 च्या 4 थ्या पर्वात सहभाग, 93 व्या आ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून सहभाग.

अनेक पुरस्काराने सन्मानित

‘मज व्हायचे’ या कवितेसाठी 10,000 मानधन देऊन पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष 89 वे आ. भा. मराठी साहित् संमेलन पिंपरी चिंचवड-यांच्याकडून सन्मानित.) महाराजा सयाजीराव गायकवाड राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, 2015 अकुंर साहित्य संघ चाळीसगाव आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांचे पारितोषिक.

साहित्य

विविध वृत्तपत्रात कविता, गझल प्रकाशित. दिव्यमराठी दिवाळी अंक 2022 आहिराणी कविता प्रसिद्ध, चैत्र पालवी (विशेषांक), तसेच विविध दिवाळी अंक, नियतकालीक, वृत्तपत्रातून कविता व गझल प्रकाशित.

संमेलनाच्या चौथ्या सत्रात ‘हास्यपंचमी’

हा एकपात्री अभिनव सादर करणार आहेत. विनोदाचा बादशहा म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे.

बंडा जोशी (पुणे)

मराठी साहित्यातील उत्कृष्ट हास्यकवी, विडंबनकार आणि विनोदी साहित्यिक रंगभूमीवरील  प्रख्यात विनोदी एकपात्री कलाकार म्हणून सरांची ओळख. देशविदेशात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाट्या संमेलनासह अनेक व्यासपीठावर गाजलेले  विनोदी कवी आणि एकपात्री कलावंत म्हणून ओळख

पहिल्या मराठी हास्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष- सातारा 2018

हास्यपंचमी या विनोदी एकपात्री कार्यक्रमाचे विक्रमी पाच हजाराहूनही अधिक प्रयोग

साहित्य, नाटक आणि सुगत संगीत, गायनविषयक अशा युवा स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर शंभराहून अधिक पारितोषिके मिळवणारा कवी, लेखक, गायक, आणि सूत्रसंचालक एक हरहुन्नरी कलाकार. आकाशवाणी पुणे केंद्रामधील नोकरीमध्ये निवेदक आणि कार्यक्रम निर्माते म्हणून 1982 ते 2006 अशी सलग एकवीस वर्षाची कारकीर्द महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेत कार्यवाह म्हणून प्रदीर्घ कारकीर्द, अनेक साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थाच्या उपक्रमांमध्ये सात्याने महत्वाचा सहभाग एककवी, लेव मोदी  कथाकार एक विडंबनकार म्हणूनही प्रसिद्ध स्वच्छंद कवितासंग्रहृ हसण्यास कारण की विनोदी कथा आणि लेखकसंग्रहृ खळखळाट, विनोदी कविता आणि विडंबनगीतांचा संग्रह प्रसिद्ध या त्याच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी विनोदी प्रयोग आणि साहित्य लेखनासाठी आचार्य अत्रे व पु.ल. पुरस्कारांसह 25 हून अधिक पुरस्कार व मानसन्मान प्रख्यात साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे याच्ंया विनोदी शैलीतील साहित्य लेखन स्पर्धेत जागतिक स्तरावरील पुरस्काराचे मानकरी. अखिल भारतीय नाट्या परिषद पुणे आणि मुंबई या दोन्ही संस्थाकडून सर्वोत्कृष्ट एकपात्री कलाकार म्हणून पुरस्कार.

Advertisement
Tags :

.