महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डिसेंबरपर्यंत गोव्याची साक्षरता शंभर टक्के

12:48 PM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा दावा : राज्याची सध्याची साक्षरता 98 टक्के,निरक्षरांना शिकविण्याची प्रक्रिया सुरु

Advertisement

अशी आहे सारक्षरता गाठण्याची प्रक्रिया

Advertisement

पणजी : राज्यातील साक्षरता शंभर टक्के करण्याचे ध्येय गोवा सरकारने ठेवले आहे. सद्या राज्यातील साक्षरता दर 98 टक्के असून येत्या 19 डिसेंबरपर्यंत हा दर शंभर टक्के निश्चितच होईल, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांकरिता ‘किलबिल’ पाठ्यापुस्तकाचे प्रकाशन शिक्षण खात्यातर्फे काल शुक्रवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकर,एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर व शिक्षण खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

पंचायतींनी निरक्षरांची माहिती द्यावी

पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील निरक्षरांची यादी शिक्षण खात्याला द्यावी. त्यानंतर  उर्वरित निरक्षर लोकांना साक्षर करण्याची मोहीम सरकारद्वारे राबविण्यात येईल. गोव्याला शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी सरकारद्वारे आवश्यक सगळे प्रयत्न केले जात आहे.

येत्या 14 जुलैची परीक्षा कुणीही चुकवू नये

राज्यातील प्रत्येक तालुक्यांत याकरिता स्वयंसेवक नेमण्यात आले आहे. यानुसार सुमारे तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना लिहायला व वाचायला शिकवून त्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात 700 जण उत्तीर्ण झाले. उर्वरित 2 हजार 300 जणांची परीक्षा 14 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कुणीही चुकवू नये असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

निरक्षरांना शिकविणाऱ्यांना मानधन 

विशेषत: सांगे, केपे व काणकोण तालुक्यांमध्ये निरक्षरांचा शोध घेतला जात असून स्थानिक ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. या भागांतील निरक्षर लोकांना कुणाला शिकवण्याची इच्छा असल्यास एससीईआरटीकडे संपर्क साधावा असे देखील सांगण्यात आले आहे. त्यांना योग्य मानधन देण्यात येणार आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

दोन ऑक्टोबरपर्यंत द्यावी यादी 

आवश्यक निरक्षरांची यादी प्राप्त झाल्यानंतर पुढील पाच महिन्यांत त्यांना प्रशिक्षण देऊन कोकणी, मराठी किंवा त्यांना हव्या असलेल्या भाषेत लिहायला, वाचायला शिकवून साक्षर केले जाईल. याशिवाय स्वयंपूर्ण मित्र तसेच पंचायतींनी त्यांच्या भागांतील निरक्षर लोकांची यादी 2 ऑक्टोबरपर्यंत शिक्षण खात्याला द्यावी. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याद्वारे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article