For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या गोवा स्टार प्रचारकांची यादी जाहीर

07:29 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या गोवा स्टार प्रचारकांची यादी जाहीर
Advertisement

मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, आदींचा समावेश

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, शशी थरूर, प्रियंका वड्रा आणि कन्हैहा कुमार यांच्यासारखे दिग्गज नेते गोव्यात दाखल होणार आहेत. या नेत्यांसह अन्य अनेक सहप्रमुख प्रचारकही येणार असून या प्रचारकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना प्रचंड दिलासा मिळाला आहे.

Advertisement

उल्लेखनीय म्हणजे पक्षाने ज्या दिग्गज प्रचारकांची यादी तयार केली आहे त्यात उमेदवारी नाकारण्यात आलेल्या फ्रान्सिस्को सार्दिन यांचाही समावेश आहे. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार कार्लोस फरेरा आणि अल्टोन डिकोस्टा यांचाही समावेश आहे.दरम्यान, नुवेच्या सरपंच फ्रेडा डिसा आणि इतरांनी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळेही काँग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे.

Advertisement
Tags :

.