कारसह सव्वा २ लाखांचा मद्यसाठा जप्त !खेड-भेलसईनजीक पोलिसांची कारवाई
झायलो कारसह चौघे ताब्यात
खेड प्रतिनिधी
तालुक्यातील भेलसईनजीक 2 लाख 31 हजार 840 ापये किंमताया गोवा बनावटाया मद्यसाठ्यासह 2 लाख 50 हजार रूपये किंमतीची झायलो कार असा एकूण 4 लाख 81 हजार 840 रूपयांचा ऐवज येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांया नेतृत्वाखालील पथकाने जप्त केला. या पकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी रात्री 11.40 ते रविवारी पहाटे 3.40 च्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.
सुमित संतोष गोरिवले (27, रा. भेलसई- गोरिवलेवाडी), राजाराम तानाजी जोईल (52,रा. खेर्डी-चिपळूण), दिनेश दगडू कदम (40, रा. वालोपे-बेंडकरवाडी, चिपळूण), सुधाकर कदम (रा. भेलसई-गंगवाडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. महिंद्रा कंपनीची झायलो कारमधून (एमएच 04/इएफ 8901) ते गोवा बनावटाया मद्याची वाहतूक करत असल्यी गोपनीय माहिती मिळता पोलिसांनी सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास भेलसईनजीक मद्यसाठ्याची वाहतूक करताना चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांच्या धडक कारवाईने बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.