कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समर्थनगर येथे 1 लाखाचा दारूसाठा जप्त

10:52 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा बनावटीच्या विविध कंपन्यांच्या बॉटल जप्त : दोघांना अटक

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी विभागाने बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. सोमवारी रात्री 10.30 च्या सुमाराला समर्थनगर येथे बेकायदेशीर दारूसाठा केलेल्या ठिकाणी धाड टाकून 1 लाख 5 हजार 618 रुपये किमतीची गोवा बनावट दारू जप्त केली आहे. याप्रकरणी जिरफी देवरथ सौन्न, सूरज सुभाष गायकवाड यांना अटक केली आहे. त्यांनी दारूविक्री करण्यासाठी गोवा बनावटीचा साठा केला होता. याची माहिती अबकारी विभागाला मिळाली. बेळगाव अबकारी अप्पर आयुक्त, अबकारी संयुक्त आयुक्त, बेळगाव दक्षिण विभाग अबकारी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. समर्थनगर येथे असलेल्या एका घरावर धाड टाकून आयबी 16 बॉटल्स, डीएसपी ब्लॅक 25 बॉटल्स, रॉयल स्टॅग 18 बॉटल्स, मॅझिक मुव्हमेंट 13 बॉटल्स, रिसर्वे-7 कंपनीच्या 12 बॉटल्स, ओल्डमंक 9 बॉटल्स असे एकूण 69.700 लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले. एकूण 1 लाख 5 हजार 618 रुपये किमतीचे हे मद्य आहे. याप्रकरणी दोघांवर कर्नाटक अबकारी शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article