कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur News : सोलापूर जिल्ह्यांत नगरपरिषद निवडणुकांसाठी तीन दिवस दारू दुकाने बंद

05:55 PM Dec 08, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                         सोलापूरात १ ते ३ डिसेंबर पूर्ण दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Advertisement

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, पंढरपूर, सांगोला रु या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी सर्व दारु दुकाने मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Advertisement

निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये प्रदानकेलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी दारु बिक्री बंदीचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा । नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-२. एफएल-३, एफएल-४ (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-२, सीएल-२, सीएल-३., सीएल/एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) इत्यादी) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी १ डिसेंबर २०२५ (मतदानाचा आदला दिवस) अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुजे, बार्शी, दुधनी, मेंदी, करमाळा, कुर्दुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद बंदचा कालावधी संपूर्ण दिवस कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी ०२ डिसेंबर २०२५ (मतदानाचा दिवस) संबंधीत निर्वाचन क्षेत्र अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद बंदचा कालावधी संपूर्ण दिवस कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी ०३ डिसेंबर २०२५ (मतमोजणीचा दिवस) संबंधीत निर्वाचन अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर सांगोला नगरपरिषद बंदचा कालावधी संपूर्ण दिवस ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारको विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

Advertisement
Next Article