मद्यप्रेमींना पुन्हा दरवाढीचा फटका
कर वाढविल्याने बियरच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ
प्रतिनिधी/ बेंगळूर
मद्यप्रेमींना पुन्हा दरवाढीचा फटका आहे. बियरवरील कर वाढवण्यात आल्यामुळे बुधवारपासून 10 ते 20 रुपयांनी दरवाढ होणार आहे. अबकारी खात्याने गेल्या 17 महिन्यांत पाचव्यांदा बिअरच्या दरात वाढ केली आहे. महिनाभरापूर्वी कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मद्य उत्पादक कंपन्यांनी दरात वाढ केली होती. मात्र, आता पुन्हा त्यात वाढ करण्यात आली असून वर्षभरात बियरच्या किमतीत 50 ते 60 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने यापूर्वी बियरवर 20 टक्के अतिरिक्त कर लागू केला होता. त्यानंतर मद्य कंपन्यांनी उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात बियरच्या किमतीत 10 रुपयांनी वाढ केली होती. आता कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी बियरच्या दरात वाढ केली आहे. अशाप्रकारे 15 महिन्यांत बिअरच्या दरात 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या गुरुवारपासून काही कंपन्यांच्या बिअरचे दर वाढले आहेत. इतर काही कंपन्यांचे सुधारित दर मंगळवार, बुधवारपासून लागू होतील. सर्व ब्रँडच्या बियरच्या प्रत्येक बाटलीच्या किंमतीत 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकारने सुऊवातीला मद्यावरील शुल्क वाढवले होते. त्यानंतर व्यावसायिक वाहनांवरील वाहतूक उपकर वाढविला होता. नंतर मुद्रांक शुल्क वाढविले. यानंतर बियाणांच्या किमती 50-60 टक्क्यांनी वाढविल्या होत्या. पेट्रोल-डिझेलचा दर प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढ केली होती. तर नंदिनी दुधाचा दर 2 रुपयांनी वाढविल्यानंतर आता पुन्हा मद्य करावर नजर टाकली आहे.