भाषिक ध्रुवीकरणामुळे तणाव वाढणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरूवात झाली आहे. मुंबईत भाजप एकीकडे धर्माच्या मुद्यावऊन काँग्रेससोबत तर दुसरीकडे भाषेच्या मुद्यावऊन शिवसेना मनसेशी लढताना दिसत आहे. यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुका या मुंबईत केलेली विकासकामे, पायाभूत सुविधा यावर व्हायच्या. मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाषिक आणि धार्मिक व्देषाचे राजकारण जोर धरताना दिसत आहे. दुबार आणि बोगस मतदारांचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच लावून धरल्याने सत्ताधारी महायुतीतील पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे.
मुंबईत भाजपची ताकद असली तरी ठाकरे बंधूंच्या विरोधात लढताना काही ठोस मुद्दे असण्याची गरज आहे. यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये सेना भाजप युती होय आम्ही कऊन दाखवले, मी मुंबईकर या टॅगलाईन खाली निवडणुका एकत्र लढली. मात्र हीच शिवसेना-भाजप आता एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. मुंबईत मराठी मतदार हे 32 टक्के तर मुस्लिम मतदार 14 टक्के आहेत, बिगर मराठी मतदार हे 54 टक्के आहेत, ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतदार हे ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपची सारी मदार ही बिगर मराठी मतदारांवर असल्याने मुंबईत या निवडणुकीत मराठी विरूध्द बिगर मराठी हा मुद्दा आता गाजू लागला आहे.
पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका 13 वर्षाच्या मुलाचा मुत्यु होतो, मालेगावमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा बलात्कार कऊन एक नराधम तिची निर्घुण हत्या करतो, फलटण येथील डॉ. संपदा मुंढे राजकारण आणि प्रशासनाचा बळी ठरते, मात्र मुंबईत लोकलमध्ये हिंदीत बोलला म्हणून मारहाण झालेल्या अर्णव खैरे याने घरी येऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राजकीय पक्ष हा थेट राजकाणाचा मुद्दा करतात, भाजपने तर थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन या प्रकरणावऊन आंदोलन केले. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेले हे पहिलेच आंदोलन, निवडणुकीच्या तोंडावर आपल्या सोयीचा राजकीय मुद्दा भेटला तर त्याचा कसा फायदा उचलायचा हे राजकारण्यांना सांगायला नको. मग ते मेलेल्या माणसाचा मुद्दा देखील राजकारणाचा बनवतील. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची ओळख निर्माण केलेला एक मराठी कलादिग्दर्शक नितीन देसाई याला आपल्या स्टुडिओमध्ये आत्महत्या करण्याची वेळ यावी, आर्थिक संकटात असलेल्या देसाईंनी अनेक नेत्यांना साद घातली मात्र कोणीच त्यांची मदत केली नाही, मात्र देसाईंच्या मुत्युनंतर काही दिवस शिवसेना आणि भाजपने राजकारण केले. अभिनेता सुशांतसिंग राजपुत याच्या आत्महत्येनंतर तर मुंबईबरोबरच 2020 ला झालेली बिहार विधानसभा निवडणूकदेखील गाजली होती. मुंबईत आत्महत्या केलेल्या सुशांतसिंग राजपुत आत्महत्येचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस मुंबईत आली होती, कारण त्यावेळी बिहारची विधानसभा निवडणूक होती. सांगायचा मुद्दा हाच आहे की आता विकासकामे, पायाभूत सुविधा यापेक्षा भाषिक, धार्मिक द्वेषाचे राजकारण हाच निवडणुकीचा मुद्दा राहिला आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, त्यात मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या तर ठाण्यात आनंद दिघेंच्या नावाशिवाय निवडणुका लढता येत नाहीत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगत भाजपसोबत उध्दव ठाकरे यांच्या विरोधात लढवल्या. आता मात्र राज आणि उध्दव ठाकरे एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गटासाठी मोठी अडचण ठरणार आहे. भाजपने बिगर मराठी मतदारांची स्वत:ची व्होट बँक तयार केली आहे. भाजप ही बिगर मराठी मतदारांसाठी शिवसेना मनसे विरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे नवाब मलिक जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईचे निवडणूक प्रमुख असतील तर आम्हाला महायुतीच नको असे सांगत, बिगर मराठी मतदारांबरोबरच हिंदु मतदारांमध्ये देखील मुस्लिमांना विरोध करत असल्याचे दाखवत आहे. मारवाडी-गुजराती, उत्तर भारतीय, हे मुंबईतील बिगर मराठी मतदार हे भाजपचे पारंपारिक मतदार समजले जातात. भाजपच्या महायुतीसोबतच असलेल्या अजित पवारांनी दलित आणि मुस्लिम मतदार, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मराठी मतदारांना आपल्याकडे वळवावे अशी महायुतीची सुरूवातीची रणनिती होती. मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतदार दुसरा पर्याय निवडतील असे वाटत नाही. राज ठाकरे यांनी कालच रात्र वैऱ्याची आहे, सावध रहा नाही तर ही निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल असे वक्तव्य एका कार्यक्रमात बोलताना केले. याचा अर्थ मराठी बिगर मराठी वाद हाच महापालिका निवडणुकांच्या केंद्रस्थानी असणार आहे.
उध्दव ठाकरे यांच्यावर भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते कोणत्याही भाषेत आरोप करतात, भाजपला केवळ संजय राऊत वगळता कोणी अंगावर घेत नव्हते. मात्र मनसेतून भाजप नेत्यांना काय एकनाथ शिंदेना देखील मनसेचे नेते त्यांच्याच भाषेत उत्तर देताना दिसत आहे. भाजपने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आंदोलन करणे, हे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंना तरी मान्य असणार का? मराठी मतदारांना आवाहन करणाऱ्या एकनाथ शिंदेंची भाजपने या आंदोलनाने चांगलीच गोची केली आहे. बोगस मतदार आणि दुबार मतदारांच्या मुद्यावऊन विरोधकांनी चांगलेच वातावरण तापवले. काँग्रेसने जरी हा मुद्दा प्रथम मांडला असला तरी, राज ठाकरे यांनी या मुद्यावऊन निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांची कोंडी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हा मुद्दा चांगलाच गाजणार, ठाकरे बंधू विरूध्द भाजप असाच थेट सामना होताना दिसत आहे. भाजप एकाच वेळी मुस्लिमांच्या मुद्यावर काँग्रेसला तर मराठीच्या मुद्यावर शिवसेना मनसेसोबत लढताना दिसत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम आणि अस्लम शेख यांच्यात झालेला राडा, त्यानंतर भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अस्लम शेख यांनी धमकी दिल्यावऊन रविवारी भाजपने थेट मालवणीत येऊन अस्लम शेख यांना आव्हान देत भाजपने योग्य तो इशारा दिला आहे.
दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येताना मराठी भाषेचा आग्रह धरला. त्रिभाषा सक्तीच्या धोरणाला विरोध केला, भाजप जरी बोंबलत सांगत असली की मराठीला नरेंद्र मोदींनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, तरी मराठी भाषिक मतदार हे भाजपचे कधीच होऊ शकत नाही. हे मतदार कदाचित एकनाथ शिंदे यांच्याकडे वळले असते, मात्र त्रिभाषा सुत्रीचा निर्णय रद्द केल्यानंतर वरळीत ठाकरे बंधू एकत्र आलेल्या मराठी भाषिकांच्या विजयी मेळाव्याला शिंदे यांच्या शिवसेनेचा कोणीच प्रतिनिधी नव्हता. त्यानंतर काही दिवसात झालेल्या मिरा भाईंदरमध्ये मराठी विरूध्द अमराठी संघर्षानंतर मराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला गेलेल्या शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना मराठी लोकांनी पिटाळून लावले. त्यामुळे आता शिंदे सेनेची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कोणत्या विषयावर दावा सांगायचा, मराठीच्या की बाळासाहेबांच्या विचारांचा. भाजपकडून आगामी काळात उत्तर भारतीय नेत्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात थेट ठाकरे बंधू तसेच मराठी भाषिकांना देखील हे नेते चॅलेंज देऊ शकतात. बटोगे ते कटोंगे असे बॅनर सुध्दा लावू शकतात, तर दुसरीकडे रात्र वैऱ्याची आहे म्हणत मराठी लोकांना देखील एकसंध राहण्याचे आवाहन केले जाईल. पण हे सगळ होत असताना एकमात्र नक्की आत्तापर्यंतच्या मुंबई महापालिका निवडणुका मी मुंबईकर, होय कऊन दाखवले, ख•sमुक्त मुंबई, पावसाळ्यात होणारी मुंबईची तुंबई अशा मुद्यावर रंगायची, ती यंदा मात्र थेट धार्मिक आणि भाषिक व्देषाच्या राजकारणातून होताना दिसत आहे हे मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या भवितव्यासाठी भूषणावह नाही.
प्रवीण काळे