‘युपीआय लाइट’ची मर्यादा वाढवली
भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय : आता युपीआय लाइट अंतर्गत, प्रति व्यवहार मर्यादा 1,000 रुपये
वृत्तसंस्था/मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने बुधवारी डिजिटल पेमेंट सोल्यूशन युपीआय लाइटची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. आता युपीआय लाइट अंतर्गत, प्रति व्यवहार मर्यादा 1,000 रुपये आणि वॉलेटमधील रक्कम 5,000 रुपये करण्यात आली आहे. चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) च्या निर्णयाची घोषणा करताना, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु काही व्यवहारांच्या मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, ‘ळझ्घ्123झ्aब् मधील प्रति व्यवहार मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, युपीआय लाइट वॉलेट मर्यादा 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि प्रति व्यवहार मर्यादा 100 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आली आहे.
मर्यादा वाढवून डिजिटल पेमेंटला चालना द्या
आरबीआयने सांगितले आहे की युपीआय मर्यादा वाढवण्याचा उद्देश युपीआय अधिक सोयीस्कर आणि सर्वसमावेशक बनवणे आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यूपीआयच्या व्यापक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तुमच्या व्यवहारांसाठी कोणती युपीआय मर्यादा लागू आहे?
ळझ्घ्123झ्aब् साठी युपीआय मर्यादेतील बदल जे स्मार्टफोन वापरत नाहीत आणि फीचर फोन वापरतात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. आरबीआयने या विभागासाठी सध्याची पेमेंट मर्यादा 10,000 रुपये केली आहे. हे वैशिष्ट्या विशेषत: अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय देखील युपीआयसह डिजिटल पेमेंट करू इच्छितात.
युपीआय लाइट वॉलेट
आता युपीआय लाइट वॉलेट वापरून 5,000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाऊ शकतात, तर आधी ही मर्यादा 2,000 रुपये होती. युपीआय लाइट हे एक प्रकारचे डिजिटल वॉलेट आहे जे मोबाईल उपकरणांवर छोट्या व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. युपीआय लाइट पेमेंट सिस्टम बँकिंग पायाभूत सुविधा न वापरता काम करते. वापरकर्ते आता युपीआय लाइट वॉलेटमध्ये 5,000 रुपयांपर्यंत शिल्लक ठेवू शकतात, जे आधी 2,000 रुपये होते. ही शिल्लक लहान व्यवहारांसाठी वापरली जाऊ शकते. यापूर्वी, या प्रणालीमध्ये प्रति व्यवहार मर्यादा 100 रुपये होती, जी आता आरबीआयने वाढवून 500 रुपये केली आहे. जेव्हा शिल्लक संपेल, तेव्हा ते लिंक केलेल्या बँक खात्यातून रिचार्ज केले जाऊ शकते.