महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जणू ढगांमध्येच वसलेले शहर

06:46 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल फारशी माहिती नसते. एक असेच सुंदर शहर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची छायाचित्रे पाहून हे ठिकाण पृथ्वीवर आहे का आकाशात असा भ्रम तयार होतो.

Advertisement

एखाद्या ठिकाणाची स्वर्गाशी तुलना करताना लोकांना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. परंतु एक असेच शहर जणू स्वर्गाप्रमाणेच ढगांदरम्यान वसलेले आहे. हे शहर दक्षिण इटलीत असून याच्या उंचीमुळे याला ढगांवर वसलेले शहर म्हटले जाते. या शहराचे नाव रोटोंडेला असून याच्या नैसर्गिक सौंदर्यासमोर सर्वकाही फिके पडते.

Advertisement

रोटोंडेला शहराचे हवाई चित्र एका व्हिडिओत दिसून येते. यात चहुबाजूला केवळ ढगच ढग अन् पर्वत दिसून येतात. याचदरम्यान एका पर्वतावर पूर्ण शहर वसलेले असल्याचे दिसून येते. रोटोंडेला शहर समुद्र सपाटीपासून 576 मीटरच्या उंचीवर आहे. तसेच ते स्वत:च्या मनमोहन दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. रोटोंडेलाला आयोनियन सागराची बाल्कनी देखील म्हटले जाते.

संबंधित व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. हे शहर स्वत:च्या सौंदर्यासोबत सांस्कृतिक समृद्धीसाठी देखील ओळखले जाते. येथे ऐतिहासिक चर्च असून उत्कृष्ट वास्तुकलेचे नमुने आहेत. येथे ढग दाटू लागलयावर शहर ढगांवर तरंगत असल्याचा आभास निर्माण होतो. रोटोंडेलाची लोकसंख्या 2,550 असून ते 76 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article