कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत 829 किमीपर्यंत चमकली वीज

07:00 AM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2017 च्या घटनेकडून विश्वविक्रमाची नेंद

Advertisement

अमेरिकेच्या आकाशात ऑक्टोबर 2017 मध्ये मोठी वीज कडाडली होती. ही चमकलेली वीज टेक्सासपासून कंसासपर्यंत दिसून आली होती. आता 8 वर्षांनी वैज्ञानिकांनी गणना करून ही वीज जगातील सर्वात लांब आकाशीय वीज होती असे शोधून काढले आहे. वीज 829 किलोमीटरपर्यंत उत्तर अमेरिकेच्या आकाशात चमकली होती. या घटनेने 29 एप्रिल 2020 रोजी टेक्सास, लुइसियाना आणि मिसिसिपीमध्ये झालेल्या 768 किलोमीटर लांब मेगाफ्लॅशचा विक्रमही मोडीत काढला. आतापर्यंत यालाच जगातील सर्वात लांब आकाशीय वीज मानले जात हेते. परंतु आता 2017 च्या आकाशीय विजेने हा विक्रम मोडला आहे. जागतिक हवामान शास्त्र संघटनेने याची घोषणा केली आहे.

Advertisement

उपग्रहाद्वारे गणना

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 22,236 मैल उंचीवर गोज ईस्ट हवामान उपग्रह प्रदक्षिणा घालत असतो. संशोधकांनी याच्या डाटाचा वापर करत सर्वात विशाल आकाशीय वीजेची गणना केली. अशा घटनांना ग्राउंड बेस्ड लाइटनिंग डिटेक्शन नेटवर्कद्वारे पकडणे सोपे नसते. याचमुळे याकरता उपग्रहाची मदत घेतली जाते. 100 किलोमीटरपेक्षा अधिक फैलाव असलेल्या आकाशीय वीजेला दुर्लभ घटना मानले जाते आणि याला मेगाफ्लॅश म्हटले जाते. मेगाफ्लॅशला ट्रॅक करताना अत्यंत खबरदारी बाळगावी लागते. उपग्रहाकडून मिळालेल्या डाटाला ग्राउंड बेस्ड डाटाशी मिळवून थ्रीडी मॅपिंग केले जाते आणि मग गणना केली जाते. अनेकदा ढगांकडून वीजेच्या काही हिस्स्यांना झाकोळण्यात येत असल्याने योग्य गणना होऊ शकत नाही. आकाशीय वीज एक अद्भूत नैसर्गिक घटना असून ती वायुमंडळीय विक्षोभामुळे कणांच्या टक्करीमुळे आणि विद्युत आवेश निर्माण झाल्याने घडत असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article