महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धोकादायक विसर्जनस्थळी दृष्टीचे जीवरक्षक करणार मदत

12:28 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

45 समुद्रकिनाऱ्यांसह 57 प्रमुख ठिकाणी तैनात : 28 सप्टेंबरपर्यंत चालणार मदत सेवाकार्य

Advertisement

पणजी : राज्यात अविश्रांत कोसळणाऱ्या पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. मान्सून अद्याप सक्रिय असल्याने बहुतेक नद्या भरून वाहत आहेत. अशा नद्या, किनारे पाण्यात उतरण्यासाठी सुरक्षित नाहीत. अशावेळी विसर्जन काळात काही अघटीत घडू नये यासाठी यंदा दृष्टीचे जीवरक्षक, स्वयंसेवक त्यांच्या मदतीसाठी येणार आहेत. राज्यात 45 समुद्रकिनाऱ्यांसह एकूण 57 प्रमुख ठिकाणी असे जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. सरकारतर्फे दृष्टी जीवरक्षकांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या वेळी हे लाईफसेव्हर्स गणेशभक्तांवर नजर, देखरेख ठेवतील, तसेच विसर्जन ठिकाणी उग्र प्रवाह असेल, पाण्यात उतरणे धोकादायक ठरणारे असेल तर अशा ठिकाणी भक्तांना मूर्ती पाण्यात नेण्यासाठीही ते मदत करणार आहेत.

Advertisement

विसर्जन काळात 45 समुद्रकिनारे आणि 12 विसर्जन स्थळांवर हे जीवरक्षक आणि स्वयंसेवक काम करणार आहेत. दि. 28 सप्टेंबरपर्यंत त्यांचे हे सेवाकार्य चालणार आहे. विसर्जन विधीनंतर ते भक्तांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर परतण्यासाठी मदत करतील, अशी माहिती दृष्टी मरीनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जन करण्याच्यावेळी कोणताही धोका पत्करू नये, पाणी खोल आणि त्याचा प्रवाह उग्र असेल तर तेथे उतरण्याचे धाडस करू नये, सावधगिरी बाळगून गणेशविसर्जन करावे, असे आवाहन दृष्टीने केले आहे. गरज भासल्यास जीवरक्षकांची मदत घ्यावी, असा सल्लाही सदर अधिकाऱ्याने दिला आहे. तरीही एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास बॅकअप लाईफसेव्हर टीम आणि वाहनेही स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यभरात या ठिकाणांवर असणार जीवरक्षक

उत्तर गोव्यात कळंगूट, बागा, कांदोळी, सिकेरी, वागातोर, अंजुणे, हरमल, मिरामार, दोना पावला, शिरदोन, मोरजी, आश्वे, मांद्रे, केरी, नेरूल तसेच दक्षिण गोव्यात बायणा, बोगमाळो, वेळसांव, आरोशी, व्हळांत, माजोर्डा, उतोर्डा, बेतालभाटी, कोलवा, सेर्नाभाटी, बाणावली, वार्का, झालोर, केळशी, मोबोर, बेतुल, खणगिणी, आगोंदा, खोला, पाळोळे, पाटणे, राजबाग, कोळंब, गालजीबाग, तळपण, पोळे आणि काब द राम आदी ठिकाणांवर हे जीवरक्षक तैनात असतील. म्हापसा येथील तार आणि ग्रीन पार्क, पणजीत हॉटेल फोर पिलर्स, पणजी आणि बेती फेरी धक्के, अस्नोडा, वाडे तलाव, पर्रा-वेर्ला तलाव, मोरजी तलाव, हळदोणे तलाव, कुंभारजुवे, येथेही जीवरक्षक तैनात असतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article