महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रखरखीत वाळवंटाखाली जीवसृष्टी ?

06:12 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दक्षिण अमेरिकेतील चीली या देशातील अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात कोरडे आणि रखरखीत आहे. या वाळवंटातून मैलोगणती प्रवास केल्यानंतरही हिरव्या गवताचे एखादे पाते पावसाळ्याच्या दिवसांमध्येही दृष्टीस पडत नाही, असे अनेकजण म्हणतात. अशा या पृथ्वीवरील सर्वात रुक्ष प्रदेशाच्या खाली एक सजीवसृष्टी नांदते आहे, असे सांगितल्यास ते खोटे वाटण्याचा संभव आहे. मात्र, हे सत्य आहे, असे शास्त्रीय संशोधनातून अनेक संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Advertisement

अर्थातच ही जीवसृष्टी आपण समजतो तशी मानव, मोठे प्राणी, वृक्ष किंवा तत्सम सजीवांची नसणार हे उघडच आहे. ही जीवसृष्टी सूक्ष्मजीवांची आहे. विविध प्रकारचे जीवाणू (बॅक्टेरिया) आणि अत्यंत सूक्ष्म जीव या सृष्टीचे कर्ते आहेत. नुकताच या जीवसृष्टीचा शोध लागला असून याच कारणासाठी आता जगभरातील संशोधकांचे लक्ष या वाळवंटाकडे नव्याने केंद्रीत झाले आहे. या वाळवंटाच्या काही भागांच्या खाली भूपृष्ठापासून अडीच ते तीन फूट खोलीवर सजीव जीवाणू बऱ्याच वर्षांपूर्वी आढळून आले होते. तथापि, वाळवंटाखालची ही जीवसृष्टी इतकी व्यापक आणि वैविध्यपूर्ण असेल असे त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते.

Advertisement

ही जीवसृष्टी ‘अॅक्टिनोबॅक्टेरिया’ नामक जीवाणूंच्या समूहाने बनलेली आहे. हा जीवाणू समूह अत्यंत प्रतिकूल वातावरणातही तग धरुन राहण्याची क्षमता असलेला आहे. या समूहात अक्षरश: लक्षावधी प्रकारांचे जीवाणू असतात. ते ध्रूवीय प्रदेशातील असह्या थंडी, वाळवंटातील जीवघेणी उष्णता किंवा उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्येही जीवंत राहून आपले संवर्धन करु शकतात, असे दिसून आले आहे. त्यांच्यातील अनेक जीवाणू हे मानवासाठी उपयुक्त आहेत. आता अटाकामा वाळवंट हे अशा जीवाणूंचा स्वर्ग आहे हे समजल्यामुळे संशोधन वेगाने होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article