For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मरकुंबीमधील हिंसाचार प्रकरणात 98 दोषींना जन्मठेप

10:06 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मरकुंबीमधील हिंसाचार प्रकरणात 98 दोषींना जन्मठेप
Advertisement

बेंगळूर : कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात दलितांवर झालेल्या हिंसाचार प्रकरणी 101 पैकी 98 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर तीन आरोपींना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. कोप्पळच्या जिल्हा मुख्य आणि सत्र न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला आहे. 2014 मधील जातीय दंगली प्रकरणी एकूण 101 जणांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यापैकी 98 जणांना जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड तसेच इतर तिघांना खुनाचा प्रयत्न, हिंसाचार प्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 28 ऑगस्ट 2014 रोजी मरकुंबी गावात सवर्ण आणि दलितांमध्ये संघर्ष झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.