For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व प्रकारच्या पुस्तकांनी सज्ज धामणे येथील ग्रंथालय

10:35 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व प्रकारच्या पुस्तकांनी सज्ज धामणे येथील ग्रंथालय
Advertisement

वार्ताहर/धामणे

Advertisement

शासनाकडून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बऱ्याच सुविधा दिल्या जातात परंतु या सुविधा सर्वांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम शासनाने नेमलेल्या मुकादमाचे असते. असे मुकादमाचे कार्य धामणे येथे ग्रंथालयाच्या माध्यमातून काम करणारे ग्रंथपाल बाळू बाबू जायाणाचे हे अत्यंत मन:पूर्वक ग्रंथालय चालवत आहेत. धामणे येथे वाचनालय नव्हते. परंतु बाळू जायाणाचे यांनी बरेच परिश्रम घेऊन 2007 साली शासनाच्या ग्राम पंचायत येथे ग्रंथालय या योजनेंतर्गत धामणे ग्राम पंचायतीच्या एका हॉलमध्ये सुरुवात केली आहे. या ग्रंथालयाचा धामणे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बराच फायदा करून घेऊन सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले आहेत.

या ग्रंथालयात शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची या ग्रंथालयाकडे ओढ लागली आहे. त्याचप्रमाणे शेती व्यवसायासाठी लागणारी माहिती पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्गसुद्धा माहिती मिळविण्यासाठी या ग्रंथालयात हजेरी लावत आहेत. या ग्रंथालयाचे ग्रंथपाल जायाणाचे स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम ग्रंथालयामध्ये आयोजित करतात. त्याचप्रमाणे शासनाकडून आलेल्या नागरी सुविधांची माहिती या ग्रंथालयात पुरविली जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांची आणि शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय म्हणजे धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी या भागासाठी ग्रंथालय म्हणजे महत्त्वाचे केंद्र मानले जात आहे.

Advertisement

या ग्रंथालयातर्फे आता एक चिंतन या मथळ्याखाली 2023 पासून ग्रंथालयाच्यावतीने चित्रकला, रांगोळी, निबंध, वाचन अशा स्पर्धांचे आयोजन दीपावलीनंतर करण्यात येत आहे. या ग्रंथालयाची सदस्य संख्या 800 च्या वर आहे. त्याचप्रमाणे धामणे व बाहेरील साहित्यप्रेमींनी ग्रंथालयाला अनेक पुस्तके देणगी रुपात दिली आहेत. या ग्रंथालयात एकूण 3000 पुस्तके उपलब्ध आहेत. यामध्ये कथा, कादंबरी, शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांच्या उपयोगी मॅगझिन्स, स्पर्धात्मक प्रतीज्ञा मॅगझिन्स त्याचप्रमाणे रोजची सर्व भाषेतील वर्तमान पत्रके उपलब्ध असतात. वाचकांसाठी वाचनासाठी सुसज्ज असे टेबल व उत्तम आसनाची सोय करण्यात आली असून सध्या या ग्रंथालयाला डिजिटलचा दर्जा देऊन संगणकाची व प्रिंटरची आणि ग्रंथालयात अपुरे असलेले साहित्य मिळविण्यासाठी व डिजिटलचा दर्जा मिळविण्यासाठी धामणे ग्राम पंचायतीचे अध्यक्ष व सर्व सदस्य आणि पीडीओ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.

या ग्रंथालयाला जिल्हा केंद्र ग्रंथालयाच्या मुख्य अधिकारी श्रीमती नंदी, नुमाणावर कुलकर्णी, रामय्या व तालुका पंचायत एईओ राजेश धनवडे तसेच अनेक मान्यवर व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे शासकीय कार्यक्रमातून धारवाड व बिदर येथे आयोजित कार्यक्रमात ग्रंथालयाच्या कार्याबद्दल प्रमाणपत्र मिळाले आहे. या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांचे आणि इतर वर्गातील नागरिकांची आणि या भागातून उदयास येणाऱ्या साहित्यिक तरुणांना चांगले सहकार्य मिळत आहे.

ग्रामपंचायतीचे सहकार्य मोलाचे

मी समाजसेवक असल्या कारणाने धामणे गावात ग्रंथालय नव्हते. त्यामुळे माझ्या मनाचा निश्चय केला की गावात ग्रंथालय काढून एक प्रकारची जनसेवा करण्याची संधी मिळेल. या हेतूने मी गावातील सर्व युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि गावातील इतर जाणकारांचा सल्ला घेतला. त्याप्रमाणे ग्राम पंचायतमध्ये चर्चा वरून एका रुमची मागणी केली. तेव्हा ग्राम पंचायतीनेसुद्धा ग्रंथालय सुरु करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करु, असे सांगताच मी शासनाकडे ग्रंथालयासाठी प्रयत्न सुरु केले. हे करत असताना ग्राम पंचायतीचे चांगले सहकार्य मिळाल्यामुळे मी 2007 साली ग्रंथालय सुरु केले.

-बाळू जायाणाचे (ग्रंथपाल), धामणे

Advertisement
Tags :

.