महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इटलीत 33 भारतीयांची शोषणातून मुक्तता

06:18 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुटीशिवाय दररोज 10-12 तास करायचे काम

Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

इटलीत पोलिसांनी वेरोना प्रांतातील 33 भारतीय शेतमजुरांची मुक्तता करविली आहे. या भारतीयांना गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. भारतीयांकडून वेठबिगारी करवून घेणाऱ्या दोन जणांकडून सुमारे 5 लाख युरोंचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मागील महिन्यात यंत्रात हात सापडून भारतीय मजुराचा मृत्यू झाला होता. यामुळे इटलीतील कामगारांच्या शोषणाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

भारतीयांना गुलाम करणाऱ्या टोळीचा प्रमुख भारतीयच आहे. त्याने भारतीयांना उज्ज्वल भविष्याचे आमिष दाखवून फसविले होते. भारतीयांना सीझनल वर्क परमिटवर आणत त्यांना प्रत्येकी 17 हजार युरो मिळतील असे प्रलोभन देण्यात आले होते. परंतु भारतीयांकडून गुलामांप्रमाणे शेतांमध्ये कुठल्याही सुटीशिवाय प्रतिदिन 10-12 तास काम करवून घेतले जात होते. याच्या बदल्यात त्यांना केवळ 4 युरो प्रतितासाच्या दराने मजुरी दिली जात होती.  प्रत्यक्षात ही रक्कम देखील या भारतीयांना मिळत नव्हती, कारण या भारतीयांना टोळीने कर्जाच्या जाळ्यात अडकविले होते. जोपर्यंत पूर्ण कर्ज फेडले जात नाही तोवर मजुरी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

स्थायी वर्क परमिटसाठी अतिरिक्त 13 हजार युरो जमा करावे लागतील असे काही भारतीय मजुरांना सांगण्यात आले होते. याचमुळे ही रक्कम फेडली जात नाही तोवर मोफत काम करण्याचा दबाव त्यांच्यावर आणला गेला होता.

पीडितांना सुरक्षा, कामाची संधी आणि कायदेशीर वास्तव्यासाठी कागदपत्रे देण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अन्य युरोपीय देशांप्रमाणेच इटलीत देखील मजुरांची कमतरता जाणवू लागली आहेत. इमिग्रेशनद्वारे कामगारांची कमतरता भरून काढली जात आहे. परंतु यात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article