महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घाऊक मासळी बाजारात वाहनांकडून जादा प्रवेश कराची आकारणी

12:21 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घाऊक मासळीविक्रेते संघटनेने मांडले एसजीपीडीए सदस्य सचिवांकडे गाऱ्हाणे

Advertisement

मडगाव : एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये वाहनांना प्रवेश कर लावण्यात आलेला असून सध्याच्या ठेकेदाराकडून दादागिरी करत जादा पैशांची आकारणी केली जात आहे, असा दावा करून घाऊक मासळीविक्रेते संघटनेकडून गुऊवारी एसजीपीडीए सदस्य सचिवांची भेट घेण्यात आली. त्यांनी या महिन्यातील एसजीपीडीएच्या बैठकीत सदर विषय मांडून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. एसजीपीडीए मार्केटचे प्रश्न अजूनही सुटलेले दिसत नाहीत. त्या ठिकाणी मार्केट इमारतीच्या उभारणीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. असे असतानाच आता मासळीवाहू वाहनांकडून प्रवेश कर घेणाऱ्या ठेकेदाराकडून अवाजवी पैसे घेण्यात येत असल्याची तक्रार एसजीपीडीए घाऊक मासळीविक्रेते संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेचे पदाधिकारी शेख नासिर यांनी गुऊवारी एसजीपीडीएच्या सदस्य सचिवांची भेट घेतली.

Advertisement

नासिर यांनी सांगितले की, घाऊक मासळी मार्केटमध्ये मोठ्या वाहनांना 500 ऊ., तर लहान चारचाकी वाहनांना 300 ऊ. प्रति तास अशी फी आकारण्यात येईल, असे एसजीपीडीएच्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र आता ज्या ठेकेदाराकडून पैसे गोळा केले जात आहेत तो वाहनामागे एक हजार रु. असे वाटेल तेवढे पैसे घेतो. मार्केटमध्ये पैसे गोळा करण्याचे काम ज्या व्यक्तींना दिलेले आहे त्यांच्याकडून जादा प्रवेश कराची आकारणी केली जात आहे व मासळीविक्रेत्यांची लुबाडणूक करण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला. दादागिरी करून जादा पैसे गोळा करण्यात येत असल्याची माहिती एसजीपीडीएला नव्हती. आता सदस्य सचिवांची भेट घेऊन होत असलेल्या सतावणुकीबाबत त्यांनी माहिती दिली गेली आहे. त्यांनी 19 रोजी होणाऱ्या एसजीपीडीएच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल व त्यावर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे, असे संघटनेकडून पुढे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article