For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाणी सुरू करू, कोळसा बंद पाडू!

10:49 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खाणी सुरू करू  कोळसा बंद पाडू
Advertisement

भक्कम आश्वासनांचा काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित : म्हादईचे रक्षण, अस्मितेचे संरक्षण, रोजगार निर्मितीवर भर

Advertisement

पणजी : कायदेशीर खाणी सुरू करणे, म्हादईचे रक्षण, कोळसा वाहतूक थांबविणे तसेच येथील पर्यावरण आणि अस्मिता यांचे रक्षण, संरक्षण करणे, स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करणे यासारखी भक्कम आश्वासने देणारा 21 मुद्यांचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा रविवारी काँग्रेस पक्षातर्फे प्रकाशित करण्यात आला. प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप, दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस आणि आमदार अॅल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती.

‘इंडिया’ आघाडीतील कोणीच नाही

Advertisement

काँग्रेस पक्ष हा ‘इंडिया’ आघाडीतील घटक असला तरी जाहीरनामा प्रकाशनावेळी मात्र आघाडीतील अन्य पक्षांपैकी एकाही घटकाचा सदस्य यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे उपस्थितांमधून आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. पुढे बोलताना पाटकर यांनी, भाजप सरकारने राज्यातील खाणी एका झटक्यात बंद केल्या. मात्र त्याच बंद पाडलेल्या खाणी आज 12 वर्षे उलटली तरी पुन्हा सुरू करणे या सरकारला जमलेले नाही, अशी टीका केली. भ्रष्टाचार, अमलीपदार्थ व्यवहार, वेश्या व्यवसाय, खून, बलात्कार, दरोडे, यासारख्या गोष्टींमुळे राज्याची ओळख पुसली जाऊ लागली आहे. मात्र ही ओळख कायम ठेवण्याचे काम आमचे दोन्ही उमेदवार करणार आहेत, अशी ग्वाही पाटकर यांनी दिली. पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि म्हादई नदी यांचे संरक्षण करण्यात तसेच रोजगार निर्माण करण्यातही भाजप सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवतानाच प्रमुख मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी ते महामार्ग बांधल्याचे श्रेय घेत आहेत. परंतु हे महामार्ग काही राज्याच्या हितासाठी नसून कोळसा वाहतुकदारांच्या सोयीसाठी बांधले जात आहेत, असा आरोप पाटकर यांनी केला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना, भाजप आणि त्यांच्या भांडवलदारांनी गोव्याला उद्ध्वस्त करण्याचा जसा काही विडाच उचलला असल्याचा आरोप केला. कोळसा वाहतूक हे राज्यासमोरील मोठे संकट आहे. म्हणूनच यापूर्वीही आम्ही कोळशाच्या विरोधात आंदोलने केली होती. हा विरोध कायम राहणार आहे, असे आलेमव म्हणाले. दाबोळी विमानतळासंबंधी भाजपकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनांवर विश्वास  ठेऊ शकत नाही. हा विमानतळ वाचविण्यासाठी आता आम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.