महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू

11:05 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजयी उमेदवार जगदीश शेट्टर : मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांना मतदारांनी नेहमीच साथ दिली आहे. या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही साथ देऊन निवडून दिले आहे. मतदारांचा आपण चिरऋणी असून बेळगाव मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी कटिबद्ध आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बेळगावच्या विकासाचे व्हिजन ठरविणार आहे,असे भाजपचे विजयी उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. मतमोजणीनंतर विजय संपादन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बेळगावशी आपले जुने नाते आहे. बेळगावबाबत आपल्याला नेहमीच आपुलकी असून मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून विजयी केले आहे. या माध्यमातून विरोधकांना मतदारांनी आपण स्थानिक असल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आपण बाहेरून आल्याचे सांगत आपला विरोध केला होता. मात्र, मतदारांनी साथ सोडली नाही. त्यामुळे बेळगाव आपली कर्मभूमी असल्याचे सांगितले होते, ते सार्थ ठरले आहे. हुबळीपेक्षाही येथील मतदारांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी ठरवू. सुरेश अंगडी यांचे स्वप्न साकार करू, असे त्यांनी सांगितले. आपल्या विजयामध्ये स्थानिक आमदार, नेते, कार्यकर्ते, मतदारांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सहकार्यातूनच हा विजय शक्य झाला आहे. त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. बेळगावमध्ये आपण घर घेऊन मतदारांशी कायम संपर्कात राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बेळगावला विकासाचे केंद्र बनवू, यासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बेळगावच्या विकासाचे धोरण ठरविले जाईल. येथील जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. आपल्यावर विश्वास ठेवून साथ दिली आहे. तो विश्वास कायम स्मरणात ठेवून विकासाला प्राधान्य देऊ, असे शेट्टर यांनी सांगितले.

Advertisement

संयमी-अनुभवी राजकारणी

जगदीश शेट्टर यांचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बेळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे, हे सिद्ध झाले आहे. बाबागौडा पाटील यांच्या काळापासून या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्यासह (कै.) सुरेश अंगडी यांनी चार वेळा व मंगल अंगडी यांनी एकवेळ हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. जगदीश शेट्टर यांचे काम पाहून मतदारांनी त्यांना संधी दिली आहे. शिवाय एक संयमी आणि अनुभवी राजकारणी या दृष्टीने त्यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे भाजपला हा विजय प्राप्त झाला आहे. जगदीश शेट्टर यांचे अभिनंदन तसेच पक्षाध्यक्ष विजयेंद्र व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद.

- महांतेश कवटगीमठ, माजी सदस्य, विधानसभा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article