महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हल्ल्याच्या स्थितीत परस्परांना करू मदत!

06:05 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुतीन अन् किम यांची मोठी घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ प्योंगयांग

Advertisement

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे 24 वर्षांमध्ये पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. पुतीन यांचे उत्तर कोरियात जोरदार स्वागत करण्यात आले. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथील किम इल सुंग चौकात आयोजित स्वागत सोहळ्यात पुतीन आणि किम जोंग उन यांनी भाग घेतला. यावेळी दोन्ही नेत्यांनी रशिया किंवा उत्तर कोरियापैकी कुणावरही त्रयस्थ देशाने हल्ला केला तर परस्परांना मदत करण्याची घोषणा केली आहे.

पाश्चिमात्य देशांबद्दल वाढते शत्रुत्व आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय चिंतांदरम्यान पुतीन यांनी हा दौरा केला आहे. प्योंगयांग शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम यांनी एका भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. यात दोन्हीपैकी कुठल्याही देशावर हल्ला झाल्यास परस्परांना सहाय्य करण्याची प्रतिज्ञा सामील आहे.

दोन्ही देशांमध्ये झालेला हा सर्वात मजबूत करार आहे. राजकारण, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि सैन्यासमवेत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची सुविधा यामुळे प्राप्त होणार असल्याचे उद्गार किम यांनी काढले आहेत. किम यांच्यासोबत सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. रशिया कराराच्या अंतर्गत उत्तर कोरियासोबत सैन्य-तांत्रिक सहकार्य विकसित करणार असल्याचे वक्तव्य पुतीन यांनी केले आहे.

अमेरिकेची चिंता वाढली

पुतीन यांनी दोन्ही देशांचे संबंध समानता आणि परस्पर सन्मानावर आधारित असल्याचे म्हटले. तसेच नवा द्विपक्षीय करार आगामी अनेक वर्षांसाठी दोन्ही देशांमधील संबंधांचा पाया ठरणार असल्याचा दावा केला. किम हे पुढील बैठकीसाठी मॉस्को दौऱ्यावर येतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील संबंधांमुळे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. उत्तर कोरियाकडून रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात असल्याने युरोपमधील संकट वाढणार आहे. तर रशियाकडून उत्तर कोरियाला सैन्य तंत्रज्ञानाचे हस्तांतरण होण्याची भीती दक्षिण कोरियाला सतावत आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article