For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पायांनी श्वास घेणारा प्राणी

09:55 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पायांनी श्वास घेणारा प्राणी
Advertisement

वाईट स्थितीत वाचण्यासाठी करतो खास उपाय

Advertisement

सागरी माकड किंवा सी मंकी छोटा परंतु आकर्षक जीव आहे. हा प्राणी लहान मुले आणि प्रौढांचे लक्ष वेधून घेत असतो. वैज्ञानिक स्वरुपात याला आर्टेमिया सलीना या नावाने ओळखले जाते. पहिल्यांदा 1950 च्या दशकात ‘इंस्टेंट पेस्ट’च्या  स्वरुपात यांचे मार्केटिंग करण्यात आले होते. तेव्हापासून एक लोकप्रिय विज्ञान प्रयोग ते ठरले आहेत.

सी मंकी 1957 मध्ये हेरॉल्ड वॉन ब्रॉनहुत यांच्या कल्पनेचे फळ होते. सरळ, देखभालीत सोप्या पाळीव प्राण्यांना असलेली मागणी ओळखली आणि एका फार्मवर यशस्वी निर्मिती केली. केवळ पाण्याने जिवंत राहू शकतील असा जीव निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. सी मंकीज मुले आणि प्रौढांमध्ये त्वरित लोकप्रिय ठरले.

Advertisement

सी-मंकीमध्ये क्रिप्टोबायोसिसच्या स्थितीत जाण्याची अत्यंत खास पात्रता असते. यात त्यांची अंडी दीर्घकाळापर्यंत टोकाच्या नैसर्गिक वातावरणाचा सामना करू शकतात. क्रिप्टोबायोसिसमुळे अंडी अनेक वर्षांपर्यंत निष्क्रीय आणि मृतवत असतात. परंतु पाणी टाकताच ते पुन्हा जिवंत होतात.

पाणी ओतताच निर्जीव वाटणारी सी मंकीची अंडी जवळपास त्वरित फुटू लागतात. जो छोटा जीव बाहेर निघतो त्याला नॉप्लिअस लार्वा म्हणून ओळखले जाते. 8-10 आठवड्यांदरम्यान हा लार्वा पूर्णपणे परिपक्व प्रौढांमध्ये विकसित होतो आणि यादरम्यान त्यांना वाढताना आणि बदलताना पाहणे सी-मंकीला पाळणाऱ्यांसाठी आनंदाचे कारण असते.

सी-मंकीचे सर्वात असामान्य जैविक वैशिष्ट्या म्हणजे ते स्वत:च्या पायांनी श्वास घेतात. या प्रक्रियेला शाखा श्वसन म्हटले जाते. जेथून ते पाण्यातून ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी स्वत:च्या पायांचा वापर करतात. हे आकर्षक वैशिष्ट्या अनेक जलीय आथ्रोपोड्समध्ये सामान्य आहे.

सी-मंकी केवळ एका डोळ्यासमवेत जन्माला येते, परंतु जसजसे ते मोठे होऊ लागते, त्यांचे आणखी दोन डोळे विकसित होतात. याचमुळे डोळ्यांची एकूण संख्या तीनवर पोहोचते. हा अनोखा विकास त्यांना प्राण्यांच्या साम्राज्यात एका अनोख्या जीवांपैकी एक ठरवतो.

सी-मंकी अत्यंत फोटोटॅक्टिक असतात, याचा अर्थ ते प्रकाशाकडे आकर्षित होता. त्यांच्या टँकनजीक टॉर्च पेटवून त्यांना प्रकाशाच्या दिशेने पाहताना पाहू शकता. आकारात केवळ 2 इंचाचा हा जीव 2-3 महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतो. गुरुत्वाकर्षण नसलेल्या वातावरणातही हा प्राणी तग धरू शकतो.

Advertisement
Tags :

.