For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा कारागृहातील कैद्यांना दुग्ध व्यवसायातून स्वावलंबनाचे धडे

11:09 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा कारागृहातील कैद्यांना दुग्ध व्यवसायातून स्वावलंबनाचे धडे
Advertisement

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी वैज्ञानिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पशुसंगोपन खात्याच्यावतीने कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवार दि. 5 जुलै रोजी कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश व पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. शशीधर नाडगौडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव तेली आदींच्या उपस्थितीत व जेलर एफ. टी. दंडयन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम झाला. निवृत्त पशुवैद्याधिकारी डॉ. सी. बी. केंगार, डॉ. अशोक दुर्गण्णावर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायासंबंधी मार्गदर्शन केले. कारागृहातील जयपाल जनगौडा व रामनगौडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शशीकांत यादगुडे व संजय सनदी यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात 50 कैद्यांनी भाग घेतला होता. त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Advertisement

दुग्ध व्यवसाय फायदेशीर

दुग्ध व्यवसाय फायदेशीर व्यवसाय आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर पशुपालन व दुग्ध व्यवसायात स्वत:ला गुंतवून ठेवल्यास स्वावलंबी जीवन जगता येणार आहे. यासाठी कर्जव्यवस्थाही आहे. अनेक जण या व्यवसायात यशस्वी ठरले आहेत. दूध, दही, तूप, ताक, पनीरला बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे सुटकेनंतर कैद्यांनी या व्यवसायाकडे वळावे, असे मार्गदर्शन डॉ. शशीधर नाडगौडा यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.