For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Leopard News : ताराबाई पार्क परिसरातील बिबट्या रेस्क्यू, सोनतळी केअर सेंटर मध्ये उपचारानंतर प्रकृती स्थिर

04:25 PM Nov 12, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur leopard news   ताराबाई पार्क परिसरातील बिबट्या रेस्क्यू  सोनतळी केअर सेंटर मध्ये उपचारानंतर प्रकृती स्थिर
Advertisement

                     तीन वर्षांचा नर बिबट्या सुरक्षित

Advertisement

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील वनविभाग व पोलीस प्रशासनाने पकडलेल्या बिबट्याचे रेस्कू करून त्याला पशुवैद्यकीय तपासणीसाठी रजपूतवाडी परिसरातील सोनतळी येथील वनविभागाच्या केअर सेंटरमध्ये नेण्यात आले होते. तो नर जातीचा बिबट्या असून त्याचे वय साधरणतः ३ वर्षे आहे. तसेच त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वुडलॅण्ड हॉटेल परिसरात मंगळवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने अत्यंत तत्परतेने बिबट्याला पकडून त्याला ट्रॅक्यूलायझर गन व बचाव उपकरणाद्वारे जेरबंद केले होते. त्याला सोनतळी येथील केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. डॉक्टरांनी बिबट्याची सर्व वैद्यकीय तपासणी केली असतो तो पूर्णपणे सुस्थितीत होता. त्याच्या प्रकृतीत कोणताही बिघाड झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

बिबट्या नर जातीचा, वय साधरणतः ३ वर्ष

बिबट्याला ट्रॅक्युलायझर दिल्याने तो बेशुध्द झाला होता. त्यानंतर तो साधरणः १ तासाने शुध्दीवर आला त्याचा हार्ट रेट देखील योग्य आहे. त्याला लवकरच नैसर्गीक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. कोणत्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. याबद्दल मात्र विभागाकडून गुप्तता पाळण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.