Karad News : मुंढे वीज वितरण कार्यालयात बिबट्याचा बाबर; दोन बछड्यांसह सीसीटीव्हीत कैद
मुंढे परिसरात बिबट्याचा वावर
कराड: मुंढे (ता. कराड) येथील बीज वितरण कार्यालय आवारात दोन बछड्यांसह बिबट्याचा बाबर असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ३० व ३१ ऑक्टोबर रोजी बिबट्याचा बाबर सीसीटीव्हीत दिसत असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता विशाल ग्रामोपाध्याय यांनी दिली.
कराड दक्षिण मतदार संघातील आशियाई महामार्गाच्या पश्चिम बाजूकडील गावांत बिबट्यांची संख्या बाढली असून नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सद्या ऊसतोडी सुरू असल्याने बिबट्या दिसण्याचे प्रमाण अधिकच बाढले आहे. विजयनगर व मुंढे परिसरात शेतीबरोबरच डोंगर व झाडी असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर आहे.
दरम्यान, मुंढे वीज वितरण कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओत दोन बछड्यांसह एक बिबट्या दिसत आहे. ३० व ३१ ऑक्टोबर असे सलग दोन दिवस बिबट्याचा वावर या आवारात होता, असे ग्रामोपाद्याय यांनी सांगितले.