For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बन्नेरघट्टा वनोद्यानात सफारीवेळी बिबट्याचा महिलेवर हल्ला

11:20 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
बन्नेरघट्टा वनोद्यानात सफारीवेळी बिबट्याचा महिलेवर हल्ला
Advertisement

बेंगळूर : सफारीवेळी वाहनाच्या खिडकीजवळ बसलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी बन्नेरघट्टा वनोद्यानात घडली. या घटनेत महिला जखमी झाली असून सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वहिदा बानू (वय 50) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती चेन्नईतील असून सफारीसाठी पती आणि मुलासोबत बन्नेरघट्टा वनोद्यानात आली होती. गुरुवारी वनखात्याच्या सफारी वाहनातून सफारीसाठी गेल्यानंतर वाहनाची खिडकी उघडून बाहेर पाहत असताना बिबट्याचे दर्शन झाले. तेव्हा अचानक बिबट्याने झडप घेऊन तिच्यावर हल्ला केला. यावेळी महिलेच्या हाताला जखम झाली असून तिच्यावर जिगणी येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. घटनेविषयी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. सफारी वाहनाच्या खिडक्यांना जाळी बसविल्याने मोठा अनर्थ टळला. 15 ऑगस्ट रोजी सफारीसाठी आलेल्या 12 वर्षिय बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वन खात्याने सफारीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना लोखंडी जाळे बसविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.